खासदार राहुल शेवाळे आणि श्री राधा फाऊंडेशनचा पुढाकार

@maharashtracity

मुंबई: मुंबईच्या धारावीतील (Dharavi) नागरिकांसाठी खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) आणि श्री राधा फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत कोरोना लसीकरण मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. या मोहिमेत आयसीआयसीआय लोम्बार्ड आणि सुराना हॉस्पिटलच्या सहाय्याने दोन दिवसांत सुमारे दहा हजार धारावीकरांना मोफत कोरोना लस दिली जाणार आहे.

या मोहिमेचा शुभारंभ खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार सदा सरवणकर, नगरसेवक सुभाष नकाशे, विधानसभा समन्वयक विठ्ठल पवार यांसह अन्य मानव्यर उपस्थित होते.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत धारावी हा मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. मात्र, राज्य सरकार, मुंबई मनपा, स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि स्थानिक जनता यांच्या एकत्रित प्रयत्नांनी धारावीने यशस्वीरित्या कोरोनावर मात केली. त्यानंतर प्लाझा दानातही धारावीकरांनी पुढाकार घेतला होता. आता कोरोना लसीकरणाबाबतीतही आघाडी घेण्याच्या उद्देशाने धारवीकरांसाठी या मेगा लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री राधा फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आली.

राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेच्यावतीने धारावीमध्ये मोफत कोरोना लसीकरण केले जात आहे. दाट लोकसंख्येच्या धारावीतील लसीकरण प्रक्रियेला आणखी गती मिळावी आणि सरकारी यंत्रणांवरील भार काही प्रमाणात कमी व्हावा, या हेतूने आयसीआयसीआय लोम्बार्डच्या सहाय्याने मेगा लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या काळात अशाच रीतीने मोठ्या प्रमाणात धारवीकरांचे लसीकरण करण्याचा आमचा मानस आहे.

  • खासदार राहुल शेवाळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here