Twitter : @maharashtracity

ठाणे

जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत ठाण्यातील पिनॅकल क्लबच्या विहान गावंड याने १५ वर्षाखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत कुश पाटील याचा ३ – ० असा पराभव करत विजेतेपद पटकावले. तर पिनॅकलच्याच प्रिशा मलिक हिने ११ वर्षाखालील मुलींच्या गटात अनिका नेने हिला ३ – ० असे पराभूत करून बाजी मारली.

तसेच पिनॅकल क्लबची बानी दुबे १५ वर्षाखालील मुली, ज्ञानश्री तरडे ११ व १३ वर्षाखालील मुली, देवश्री तरडे महिला गट, विहान हळदणकर १३ वर्षाखालील मुले तर सुबोध खांडेकर याने पुरूष गटाची उपांत्य फेरी गाठली.

ठाणे जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्यावतीने कल्याण महिला मंडळाने आयोजित केलेली चौथी ठाणे जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धा दिनांक ०२ ते ०५ ऑगस्ट दरम्यान राजस्थान हॉल, कल्याण येथे पार पडली. उद्घाटन नामवंत राष्ट्रीय खेळाडू दिपाली नामजोशी यांच्या हस्ते करण्यात आले. तर पारितोषिक वितरण समारंभ राष्ट्रीय खेळाडू स्वप्नील नामजोशी यांच्या हस्ते पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here