@maharashtracity

ओमीक्रॉंनचा धोका वाढला -: आदित्य ठाकरे

मुंबई: मुंबई विमानतळावर गेल्या १० दिवसांत परदेशातून आलेल्या १ हजार पर्यटकांचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती मुंबईचे पर्यटन मंत्री व पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी दिली.

सध्या कोरोनाचा नवीन विषाणू ‘ओमीक्रॉंन’ (Omicron variant of corona) दक्षिण आफ्रिकेत धुमाकूळ घालत आहे. आफ्रिकेसह काही युरोपीय देशांतही या विषाणूची लागण झाल्याने रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. या नवीन विषाणूबाबत आणि लसीकरण (vaccination) मोहिमेबाबत पर्यटन व पालक मंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिका आयुक्त इकबाल चहल (BMC Commissioner IS Chahal) व वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत पालिका मुख्यालयात एक बैठक घेतली.

यावेळी, पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरीलप्रमाणे माहिती दिली.

कोरोनाचा नवीन विषाणू आफ्रिकेत (South Africa) व युरोपीय देशात (European Countries) धुमाकूळ घालत असताना मुंबईतील एअरपोर्टवर (Mumbai Airport) गेल्या १० दिवसात विविध देशांमधून १ हजार परदेशी नागरिक, पर्यटक विमानाने दाखल झाले आहेत.

त्यापैकी मुंबईत किती परदेशी नागरिक, पर्यटक (tourists) थांबले आहेत याचा नेमका शोध घेतला जात आहे. त्यांना शोधून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येईल. तसेच त्यांना क्वारंटाईन (quarantine) करण्याचा विचार सुरू आहे.

याबाबत, केंद्र सरकारकडून जे काही आदेश येतील त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

१५ जानेवारीपर्यंत संपूर्ण लसीकरण करण्याचे लक्ष्य

मुंबईत पालिका आरोग्य यंत्रणेकडून कोरोनावरील लसीचे डोस देण्याची मोहीम सुरू आहे. येत्या १५ जानेवारी २०२२ पर्यंत मुंबईतील प्रत्येक नागरिकाला लसीचे दोन्ही डोस (two doses of corona vaccination) देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे म्हणजे लसीकरण मोहीम पूर्णपणे पार पाडण्याचे लक्ष्य असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

कोरोनावरील लसीचा पहिला डोस १००% मुंबईकरांना देण्यात आला असून मुंबईबाहेरील २% लोकांनाही लसीचा पहिला डोस देण्यात आलेला आहे. मात्र लसीचा दुसरा डोस आतापर्यंत ७२% मुंबईकरांना देण्यात आलेला असून उर्वरित लोकांनाही लसीचा दुसरा डोस देण्याची प्रक्रिया येत्या १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

कोरोनाचा नवीन विषाणू असलेल्या ‘ओमिक्रोन’ चा धोका वाढल्यामुळे प्रत्येकाने लसीचे डोस लवकरात लवकर घ्यावेत, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांना केले आहे.

लसीकरणाचा कालावधी कमी करण्याची मागणी

लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आणि लसीकरणाचा कालावधी काही दिवसांनी कमी करण्याबाबत केंद्र सरकारकडे मागणी करण्यात येणार आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

नागरिकांनी घाबरून न जाता कोरोनाच्या या नवीन विषाणूपासून आपला व कुटुंबीयांचा बचाव करण्यासाठी मास्क (mask) घालणे, शारीरिक अंतर राखणे (Physical distance) आणि हात वारंवार स्वच्छ धुणे आदी नियमांचे कडकपणे पालन करावे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here