@maharashtracity

मुंबई: मुंबईमध्ये काही लोक व्यक्तिगत सेल्फ टेस्टिंग (Self testing of corona) करीत आहेत. त्यात पॉझिटिव्ह आल्यावर ते घाबरून सरकारी रुग्णालयात जाऊन कोविड चाचण्या करत नाहीत. त्याबाबत कोणतीही माहिती देत नाहीत. माझ्या परिचितांमध्ये असा प्रकार झाल्याचे मला समजले आहे. मात्र, पालिका अशा सेल्फ टेस्ट करणाऱ्यांची माहिती गोळा करीत आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी दिली आहे.

लता मंगेशकर यांना रुग्णालयात भेटणार

गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना कोविडची सौम्य लक्षणे असल्याने त्यांना शनिवारपासून ब्रीचकँडी रुग्णालयात (Breach Candy hospital) दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्या लवकरात लवकर बऱ्या होवोत. त्यांना बघायला रुग्णालयात जाणार आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

मात्र जर लता मंगेशकर यांना रुग्णालयात भेटू शकले नाही तरी डॉक्टरांना भेटून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करणार असल्याचेही महापौरांनी सांगितले.

मुंबईत कोविड लसीचे दोन डोस घेऊन ९ महिने झालेल्या फ्रंट लाईन (Front line workers), हेल्थ वर्कर (Health workers), ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizens) पालिका व इतर केंद्रांवर लसीचे बूस्टर डोस (booster dose) दिले जात असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती महापौरांनी यावेळी दिली.

सध्या कोविडबाबत घालून दिलेल्या निर्बधांचे पालन नागरिकांकडून काटेकोरपणे होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत मुंबईतील कोविड रुग्णांची संख्या घटली असून हे पालिका प्रशासन व समस्त मुंबईकरांचे यश आहे, असे महापौर यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here