@maharashtracity

कस्तुरबात चौथी चाचणी पूर्ण

२८१ पैकी ७५ टक्के रुग्ण डेल्टा व्हेरियंट तर २५ टक्के डेल्टा डेरिटीव्ह

मुंबई: मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात (BMC) नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये ( Next Generation Genome Sequencing Lab) चौथी चाचणी करण्यात आली आहे ( Kasturba hospital). त्यानुसार, २८१ पैकी ७५ टक्के रुग्ण डेल्टा व्हेरियंट (Delta variant) तर २५ टक्के डेल्टा डेरिटीव्ह ( Delta Derivatives) असल्याचे निदर्शनास आले आहे.

कोविड लसीकरणामुळे कोरोनाची संपूर्ण साथ नियंत्रणात आली असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात सुरू असलेल्या नेक्स्ट जनरेशन सिक्वेसिंग लॅबमध्ये आतापर्यंत तीन तुकड्यांच्या यशस्वी चाचण्या केल्यानंतर आता चौथ्या तुकडीतील चाचणीचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत.

मुंबईतील एकूण २८१ रुग्णांमधील कोविड विषाणू नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला असता डेल्टा व्हेरिअंटचे ७५ टक्के तर डेल्टा डेरिव्हेटीव्ह चे २५ टक्के रुग्ण आढळले आहेत.

महापालिकेच्या चाचणीत मुंबईतील २८१ रुग्णांपैकी ९ टक्के हे ० ते २० वर्षे आतील वयोगटातील आहेत. २१ ते ४० वर्षे वयोगटात ३० टक्के, ४१ ते ६० वर्षे वयोगटात ३४ टक्के, ६१ ते ८० वयोगटात २३ टक्के आणि ८१ ते १०० वयोगटातील ३ टक्के रुग्णांचा यात समावेश आहे.

सदर २८१ पैकी २१० रुग्ण म्हणजेच ७५ टक्के हे डेल्टा व्हेरिअंट तर २५ टक्के हे डेल्टा डेरिव्हेटीव्ह प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

डेल्टा व्हेरिअंट आणि डेल्टा डेरिव्हेटीव्ह या दोन्ही प्रकारातील कोविड विषाणू तुलनेने सौम्य त्रासदायक आहेत तर यामुळे गंभीर धोका ही उदभवत नाही. तर डेल्टा डेरिव्हेटिव्ह विषाणू चा प्रसार वेग ही कमी आहे त्यामुळे योग्य उपचार घेणे आवश्यक आहे.

तसेच, लसीचा एकही डोस न घेतलेल्या ६९ नागरिकांना कोविडची बाधा झाली असून त्यापैकी १२ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले.

तर चार जणांचा मृत्यू ओढवला आहे. मृत्यू ओढवलेले चारही रुग्ण ६० वर्ष वयांवरील वयोवृद्ध होते. यातील दोघांना दीर्घकालीन आजार होते हे सामोरे आले आहे.

तसेच, १८ वर्षापेक्षा कमी वयोगटात, ११ जणांना लडेल्टा व्हेरिअंट आणि ८ जणांना डेल्टा डेरिव्हेटीव्ह प्रकाराची कोविड लागण झाल्याचे सामोरे आले त्यामुळे बालक व लहान मुलांना कोविडची बाधा होण्याचे प्रमाण संपूर्णपणे नियंत्रणात असल्याचे स्पष्ट झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here