@maharashtracity

मुलांमध्ये अँटिबाडी निर्माण झाल्याने ट्रायलच्या निकषातून बहुतांश मुले बाद

मुंबई: लहान मुलांनादेखील कोरोना प्रतिबंधात्मक लस हवी यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. नायर रुग्णालयात कोवॅक्स लसीसाठी ट्रायल सुरु झाली आहे. मात्र, त्यासाठी अवघे ६ मुले आढळून आली. आता मुलांमध्ये अँटिबाडी निर्माण झाल्याने (antibiotics developed in children) ट्रायलसाठी कमी संख्येत मुलं आढळून येत आहेत. हि बाब लहान मुलांसाठी लस निर्मितीत प्रमुख अडसर ठरत आहे. (Difficulties in developing vaccines for children)

यावर बोलताना नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले कि, नुकताच झालेल्या सिरो सर्वेत देखील बहुतांश मुंबईकरांमध्ये अँटिबाडी तयार झाल्याचे निदान करत आहे. त्या प्रमाणे लहान मुलांमध्ये देखील अँटीबॉडी तयार झाल्या आहेत.

सिरो सर्व्हेतून ५० टक्के मुलांमध्ये अँटीबॉडी तयार झाल्याचे समोर आले. त्यामुळे या दरम्यान जी मुले ट्रायल साठी येत होती त्यांच्या अँटीबॉडी असल्याचे निदान होत होते. शिवाय ट्रायलसाठी अँटीबॉडी तयार न झालेली मुले हवी आहेत. आम्ही अशा मुलांच्या शोधात असल्याचे डॉ. भारमल म्हणाले.

Also Read: सवलत देताना कोविड नियमांच्या पालनबाबत जागृती करा -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोवॅक्स लसीच्या (Covax vaccine) ट्रायल साठी एकूण ९२० मुलांची गरज असून यातील ४६० मुले १२ ते १७ वयोगटातील हवीत. तर ४६० मुले २ ते ११ वयोगटातील हवीत. त्यांना डोस दिल्यानंतर सहा महिने यांचे निरीक्षण चालू राहील.

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमधील को वॅक्स हि लास ९० टक्के उपयुक्त असल्याचे यापूर्वी ट्रायल मधून सिद्ध झाले आहे. या लसीचे प्रत्येक मुलाला दोन डोस दिल्यानंतर २२ व्या दिवशी, नंतर ३६ व्या आणि १८० व्या दिवशी शरीरातील अँटीबॉडीची तपासणी करण्यात येईल. नायर रुग्णालयासह भारती हॉस्पिटल आणि पुण्यातील केईएम रुग्णालयात लसीची ट्रायल होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here