@maharashtracity

बिनविरोध निवडणूकीसाठी भाजपचे माघारीच्या दिवसापर्यंत प्रयत्न?

धुळे: धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणुक (Election of Dhule – Nandurbar DCC bank) बिनविरोध करण्यासाठी एकिकडे प्रयत्न सुरु असताना दुसरीकडे महाविकास आघाडीमधील (Maha Vikas Aghadi) तिन्ही पक्षांनी भाजपसोबत (BJP) न जाण्याचा पक्का विचार केल्याची चर्चा आहे. यामुळे जिल्हा बँकेची निवडणुुक बिनविरोध होण्याची शक्यता सध्यातरी मावळली आहे. (No possibility of unopposed election of DCC bank)

मात्र, अर्ज माघारीच्या दिवसापर्यंत बिनविरोध निवडणुकीसाठी भाजपमधील नेत्यांकडून प्रयत्न केले जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. यामुळे माघारीच्या दिवशी निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल.

जळगाव जिल्हा मध्यवती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठीचे सर्व प्रयत्न महाविकास आघाडीमधील काही नेत्यांच्या आडमुठे धोरणामुळे फसले. तेथे ऐनवेळेस मविआमधील नेत्यांनी भाजपसेाबत न जाता निवडणूक लढविण्याचा आग्रह धरल्याने भाजपची उमेदवार निश्‍चितीसाठी धावपळ झाली.

Also Read: लहान मुलांच्या लस ट्रायल मध्ये विघ्ने

परिणामी, मविआचे तीन सदस्य बिनविरोध निवडून आले. याचा धडा धुळे जिल्ह्यातील नेत्यांनी घ्यायला हवा होता. परंतू, येथेही शेवटच्या क्षणापर्यंत बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तो प्रयत्न मविआमधील नेत्यांच्या होकार, नकार नाट्यामुळे येथेही फसण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

धुळे-नंदुरबार जिल्हा बॅकेच्या 17 जागांसाठी 21 नोव्हेंबरला निवडणुक होत आहे. बुधवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारपर्यंत निवडणुकीसाठी अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

त्यामध्ये माजी आ.राजवर्धन कदमबांडे, ग्रामिणचे माजी आमदार प्रा.शरद पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे यांच्या पत्नी सिमा रंधे तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, काँग्रेसचे शाम सनेर, राजेंद्र देसले, सचिन आंनदा देसले, भरत माणिकराव गावीत, दिलीप साळूंखे, बाजीराव हिरामण पाटील, डॉ.दरबारसिंग गिरासे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

यामुळे शेवटच्या दिवशी दुपारपर्यंत एकूण 105 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
भाजपा नेते अमरिश पटेल, बँकेचे मावळते अध्यक्ष माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्यासह विविध पक्षांचे नेते एकत्र येवून निवडणुक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

तर नंदुरबारमधील सेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी बिनविरोध निवडीला स्पष्टपणे पसंती दिलेली नाही. तसेच तसा होकारही कळविलेला नाही. त्यांची भाजपबरोबर न जाण्याची भुमिका आहे. त्यातच राष्ट्रवादीचे पोपटराव सोनवणे यांनीही ही निवडणूक व्हावी, असा आग्रह धरला आहे.

त्यामुळे ही निवडणुक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. परंतू, शवेटी राजकारणात काहीही होऊ शकत असल्याने माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपातल दिग्गज नेते प्रयत्नशील आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here