@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिकेने ( BMC) यंदा पालिका कर्मचाऱ्यांना (municipal employees ) जाहीर केलेल्या २० हजार रुपये बोनसच्या रकमेतून इन्कम टॅक्सची ( income tax) रक्कम कापून घेण्यात येऊ नये, अशी मागणी दि म्युनिसिपल युनियनतर्फे कामगार नेते रमाकांत बने( Municipal Union leader Ramakant Bane) यांनी पालिका आयुक्त इकबाल चहल ( Municiple commissioner Iqbal Chahal) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

मुंबईत गेल्या मार्च २०२० पासून कोरोनाचा पादुर्भाव ( corona pandemic) आहे. मात्र या कोरोनाच्या कालावधीत पालिका आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर, नर्स, कर्मचारी, सफाई कर्मचारी,शिक्षक, पाणी, रस्ते खाते आदींनी चांगली कामे केली. तसेच, बेस्ट कर्मचार्यांनी, बस चालक, वाहक आदिनीही चांगले काम केले.

त्यामुळे याची दखल थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uaddhav Thackeray) यांनी घेतली. त्यांनी पालिका कर्मचारी यांना गतवर्षी पेक्षा २५% अधिक रक्कम तर बेस्ट कर्मचाऱ्यांना गतवर्षीची रक्कम दुप्पट करीत थेट २० हजार रुपये बोनस जाहीर केला आहे. त्यामुळे पालिका व बेस्ट कर्मचारी यांची यंदाची दिवाळी ( Diwali Festival) मोठ्या थाटामाटात साजरी केली जाईल.

मागील वर्षी पालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार ५०० रुपये बोनस जाहीर करण्यात आला होता. तर बेस्ट कर्मचाऱ्यांना ( Best employees) मात्र १० हजार १०० रुपये इतकाच बोनस जाहीर करण्यात आला होता. मात्र सदर बोनस रकमेतून इन्कम टॅक्सची ( income tax ) कापल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती.

यावर्षीही अशीच रक्कम कापल्यास कर्मचाऱ्यांमध्ये यंदाही नाराजी पसरणार असल्याने बोनसच्या रक्कमेतून इन्कम टॅक्सची रक्कम कापू नये, अशी मागणी दि म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here