@maharashtracity

पर्यटकांना करता येणार मुंबई सफर

मुंबई: मुंबईत कोरोनावर नियंत्रण आल्याने पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे ( Tourism Minister Aditya Thackeray) यांच्या संकल्पनेतून ३ नोव्हेंबरपासून पर्यटकांसाठी बेस्टची ओपन डेक बससेवा ( Open deck bus service) सुरू होणार आहे.

पर्यटकांना गेट वे ऑफ इंडिया ( Gate way of india) , मंत्रालय, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस ( chatrapati shivaji maharaj railway terminus), हुतात्मा चौक ( hutatma chowk) आदी महत्वाच्या ठिकाणांसह मुंबई ( mumbai) सफरीचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे.

मुंबईत कोरोनावर नियंत्रण आल्याने पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे.

तसेच, कोट्यवधी रुपयांनी तोट्यात असलेल्या बेस्ट उपक्रमाला उत्पन्न वाढीसाठी हातभार लागावा आणि पर्यटनाला चालना मिळावी या हेतूने बेस्ट उपक्रमाची शान असलेल्या ओपन डेक बसद्वारे पर्यटकांना येत्या ३ नोव्हेंबरपासून मुंबई सफर करता येणार आहे.

मुंबईतील हेरिटेज वास्तू, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस आणि मुंबई महापालिका मुख्यालयाची हेरिटेज इमारत व त्यावरील रात्रीची आकर्षक विद्युत रोषणाई आणि मुंबईतील इतर हेरिटेज वास्तू, पर्यटन स्थळे आदी ठिकाणी बेस्टच्या ओपन डेक बसने फेरफटका मारून पर्यटकांना भ्रमंतीचा आनंद घेता येणार आहे.

मुंबई शहरात अनेक पर्यटन स्थळे आहेत. हेरिटेज वास्तू आहेत. मुंबईत देश – विदेशातून येणाऱ्या हजारो पर्यटकांना मुंबईतील हेरिटेज वास्तू पाहता याव्यात, पर्यटन स्थळांना भेटी देटँक याव्यात यासाठी बेस्ट उपक्रमाने ( BEST) ३ नोव्हेंबरपासून ओपन डेक बस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

ही ओपन डेक बस पर्यटकांना, गेट वे ऑफ इंडिया येथून सुरु होणार असून प्रिन्स वेल्स ऑफ म्युझियम ( Prince velse of Museum), मंत्रालय (Mantralay) , विधानभवन (Vidhanbhavan) , एनसीपीए (NCPA) , मरिन ड्राईव्ह ( Marine drive) , चौपाटी, चर्चगेट स्टेशन ( Churchgate station) , ओव्हल मैदान ( Oval ) , राजाबाई टाॅवर ( मुंबई उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महापालिका मुख्यालय, हुतात्मा चौक, हानिॅमन सर्कल, रिझर्व बँक ऑफ इंडिया, ऐशायाटिक लायब्ररी व ओल्ड कस्टम हाऊस अशी सफर घडवणार आहे.

या पर्यटन बस सेवेअंतर्गत अपर डेक सीटसाठी प्रती व्यक्ती १५० रुपये तर लोअर डेक प्रती व्यक्ती ७५ रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

बस गाड्यांच्या वेळा -: गेट वे ऑफ इंडिया येथून – सायंकाळी ६.३० , ७. ४५ आणि ८ आणि ९. १५ वाजता या पर्यटन बसचे तिकीट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक व गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here