@maharashtracity

वैद्यकीय शिक्षण शुल्क माफी करण्याच्या आश्वासनाला सरकारकडून हरताळ

मुंबई: राज्यातील निवासी डॉक्टर प्रचंड नाराज असून कोरोना काळात न घेतलेल्या वैद्यकीय शिक्षणाचे शुल्क आकारणार का असा सवाल करत आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख (Minister Amit Deshmukh) यांच्या सोबत झालेल्या बैठकीत शुल्क माफीचे संकेत दिले असताना ही पुन्हा शुल्का बाबत विचारणा होत असल्याने राज्यातील निवासी डॉक्टरांनी आंदोलन (Resident doctors call for protest) करण्याचा निर्णय घेतला आहे. २ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या आंदोलनामुळे राज्यातील रूग्ण सेवा प्रभावित होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

निवासी डॉक्टरांची संघटना मध्यवर्ती मार्डने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड काळात शैक्षणिक फी माफीचे आश्वासन पूर्ण न झाल्याने मार्डचे निवासी डॉक्टरानी संपाचा निर्णय राज्यस्तरीय बैठकीत घेतला आहे.

कोविड काळातील निवासी डॉक्टर्स यांची रुग्ण सेवा व झालेले शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्याकडून शैक्षणिक फी माफीचे (waive off fee) आश्वासन काही महिन्यापूर्वी देण्यात आले होते. पण गरज सरो वैद्य मरो या उक्ती प्रमाणे कोविडची लाट संपताच राज्य सरकारला निवासी डॉक्टर्स व त्यांना दिलेल्या या आश्वासानांचा विसर पडला असल्याचे मध्यवर्ती मार्ड संघटनानेच्या प्रतिनिधीनींनी सांगितले.

म्हणून सेंट्रल मार्ड संघटनेची राज्यस्तरीय बैठकीत राज्य सरकारला या बाबत स्मरणपत्र देण्याचे ठरविले आहे. तसेच तात्काळ निर्णय न झाल्यास पुढच्या आठवड्यात राज्यस्तरीय आंदोलन उभारण्याचा ठराव एकमताने पारीत झाला असल्याचे मध्यवर्ती मार्ड प्रतिनिधींनी सांगितले.

हे आंदोलन १ ऑक्टोबर पासून सुरु करण्यात येणार असून यात राज्यभरातील निवासी डॉक्टर उतरणार आहेत. त्यामुळे सरकारी रुग्णालयातील रूग्ण सेवेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here