पावसाळी आजारात २० ते ३० टक्क्यांनी वाढ

@maharashtracity

मुंबई: मुंबईत सध्या मलेरियाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. जून महिन्यात ३५७ मलेरिया रूग्ण आढळले होते. तर जुलै अखेरच्या आठवड्यात मलेरियाचे ५५७ रूग्ण नोंद झाल्याने चिंता वाढली आहे. एकूण रुग्णांमध्ये ५७ टक्के वाढ झाली असून इतर पावसाळी आजारांत २० ते ३० टक्के वाढ झाल्याचे समोर येत आहे.

दरम्यान गॅस्ट्रोचे २२१ रूग्ण, २९ लेप्टो, १९ डेंग्यू, ३४ काविळ आणि ६ एच१एन१ चे रूग्ण आढळले. ही २५ जुलै पर्यंतची आकडेवारी असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आली.

यावर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, कोरोना महामारी संसर्ग सुरु झाल्यापासून मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना अधिक सजगतेने सुरु केल्या आहेत. शिवाय साथरोग बाबत जागरूकता मोठ्या प्रमाणात निर्माण करणे सुरु असल्याचे काकाणी म्हणाले.

तर पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, प्रत्येक वॉर्डात संसर्ग आणि साथरोग बाबत माहिती आणि जागरूकता वाढवली आहे. तसेच साथरोगाचे रोजचे सर्वेक्षण, निदान आणि उपचारांवर भर देण्यात आली आहे. आजाराच्या उपाय योजनांच्या अंमलबजावणीवर देखील भर देण्यात आले आहे. शिवाय प्रत्येक रुग्णालये आणि दवाखान्यांना रक्त तपासणीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोविड बाबत हाय रिस्क रुग्णांच्या रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पॉजिटीव्ह रुग्णांवर प्राधान्याने उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे डॉ. गोमारे म्हणाल्या.

पावसाळी आजारांची आकडेवारी :

आजार जुलै जून

मलेरिया ५५७ ३५७

लेप्टो २९ १५

डेंग्यू १९ १२

गॅस्ट्रो २२१ १८०

एच१एन१ १८ ६

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here