@maharashtracity

स्वादुपिंडाच्या नेक्रोसिसने होता त्रस्त

मुंबई: स्वादुपिंडाच्या नेक्रोसिसने त्रस्त असलेल्या २५ वर्षीय तरुणाला जीवनदान देणारी शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्याला घरीदेखील सोडण्यात आले असल्याचे झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे (Zen Multispeciality Hospital) संचालक आणि गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. रॉय पाटणकर यांनी सांगितले.

ही शस्त्रक्रिया डॉ. रॉय पाटणकर (Dr Roy Patankar) यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या टिमने केली असल्याचे सांगण्यात आले.

नाशिककर हर्षल शिंदे हा वैद्यकीय शिक्षणासाठी रशियात (Russia) गेला होता. ऑगस्ट २०२१ मध्ये, त्याला पाठ आणि पोटदुखी, हायपर ऍसिडिटी आणि उलट्या होऊ लागल्या. असह्य वेदनांमुळे, तो रोजचे काम तसेच अभ्यासही करू शकत नव्हता. त्याला चालणे, बसणे आणि उठणे त्रास होऊ लागले.

हर्षलची तब्येत बिघडत असल्याचे पाहून त्याच्या मित्रांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीत त्याला गॅस्ट्रोइंटेस्टाइनल (gastrointestinal) असल्याचे निदान झाले. अँटीबायोटिक्स दिल्यानंतर आणि लेपरोटॉमी (laparotomy) करण्यात आली. या तपासणीत त्याच्या पोटात समस्या आढळून आली. त्यानंतर लगेच शस्त्रक्रिया करण्यात आली.

मात्र शस्त्रक्रियेनंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नसल्याने तेथील विद्यापीठातील शिक्षक आणि मित्रांनी भारतात उपचार घेण्याचा सल्ला दिला. हर्षल भारतात त्याच्या उपचारासाठी नाशिकमध्ये (Nashik) आला. कुटुंबीयांनी त्याला तत्काळ झेन रुग्णालयात दाखल केले.

सीटीस्कॅन चाचणीत (CT Scan test) त्याला स्वादुपिंडाच्या नेक्रोसिसचे (Necrosis) निदान झाले. त्यानंतर डॉक्टरांनी रुग्णावर उपचार करून त्याला नवीन आयुष्य दिले आहे.

यावर बोलताना डॉ. रॉय पाटणकर म्हणाले, रुग्णाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्या ओटीपोटात असह्य वेदना, ताप, उलट्या आणि अन्नाचे सेवन करताना अडचणी अशा तक्रारी दिसून आल्या. यावेळी तपासणी केली असता त्याच्या पोटात पू आणि स्वादुपिंडाला सूज असल्याचे निदान झाले.

त्याने पोटाच्या वेगवेगळ्या आव भागात ३ नळ्या घातल्या आणि हळूहळू पू काढून टाकले. त्यानंतर स्वादुपिंडाची शस्त्रक्रिया करण्यात आली. ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया असून यात पु काढून टाकला जाते. तसेच स्वादुपिंडातील मृत पेशींचा भाग देखील काढण्यात येतो.

यावेळी अतिप्रमाणात होणारा रक्तस्त्राव टाळण्यासाठी पुरेशी काळजी घेण्यात आली. कारण या ठिकाणी स्वादुपिंडाभोवती अनेक प्रमुख रक्तवाहिन्या असतात. योग्य वेळी उपचार न केल्यास, संसर्ग आणखी वाढू शकतो आणि यकृत, मूत्रपिंड, हृदय, मेंदू आणि फुफ्फुसांसह सर्व प्रमुख अवयवांना धोका निर्माण असल्याचे सांगण्यात आले.

हा संसर्ग मुख्य अवयवांमध्ये रक्त प्रवाह कमी करू शकतो. ज्यामुळे कायम स्वरुपाचेदेखील नुकसान होऊ शकते. परिणामी मृत्यूदेखील होतो. परंतु रुग्णावर वेळीच उपचार केल्यास त्याच्या प्रकृतीत सुधारणा होते.

आता रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे. या व्यतिरिक्त, रुग्णाला उच्च चरबीयुक्त आहार टाळणे आणि भविष्यात मधुमेहापासून दूर राहण्यासाठी निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचा सल्ला देण्यात आल्याचे डॉ पाटणकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here