@maharashtracity

बेमुदत संपाचा इशारा

मुंबई: मुंबई महापालिकेतील लिपिकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदानात आंदोलन केले. येत्या १८ ऑक्टोबरपर्यंत जर आपल्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास बेमु!दत संप करण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे. (BMC employees threaten for indefinite strike)

मुंबई महापालिकेचे मुख्य लिपिक, वरिष्ठ लेखा परीक्षा व लेखा सहाय्यक या पदांच्या कालबद्ध पदोन्नतीसाठी खात्यांतर्गत परीक्षा उत्तीर्ण होण्याची असलेली अट शिथिल करून, त्यांना कालबद्ध पदोन्नती देण्यात यावी तसेच इतर मागण्यांसाठी शुक्रवारी लिपिकांनी पालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदानात मोठ्या संख्येने उत्स्फूर्त आंदोलन केले.

या आंदोलनाचे नेतृत्व दि म्युनिसीपल युनियन आणि हिंदुस्थान कर्मचारी संघातर्फे अध्यक्ष शशांक राव (Shashank Rao), सरचिटणीस रमाकांत बने (Ramakant Bane) आणि हिंदुस्तान कर्मचारी संघाचे अध्यक्ष दिवाकर दळवी (Diwakar Dalvi) आदींनी केले.

यावेळी, कर्मचारी संघटनेच्या नेत्यांसह शिष्टमंडळाने पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांची भेट घेऊन त्यांना कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मात्र येत्या १८ ऑक्टोबरपर्यंत जर सदर मागण्यांबाबत सकारत्मक निर्णय न घेतल्यास कर्मचारी बेमुदत संपावर जातील, असा इशाराही देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here