@maharashtracity

मुंबई: मुंबईत (Mumbai) पावसाळी आजारांनी डोके वर काढले असून, कोरोनापाठोपाठ (corona) साथरोगांनी चिंता वाढवली आहे. मागच्या महिन्यात मलेरियाचे (Malaria) रुग्ण वाढत असताना आता लेप्टोस्पायरोसिसचे (Leptospirosis) रुग्ण वाढत असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले. पालिका क्षेत्रातील तीन वॉर्डत लेप्टोचे सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार १५ ऑगस्टपर्यंत लेप्टोच्या २७ रुग्णांची नोंद झाली आहे. तर, जानेवारी ते १५ ऑगस्टपर्यंत १२३ एवढी रुग्णांची नोंद झाली आहे. यात ई, एफ उत्तर, आणि के पूर्व वॉर्डात सर्वाधिक रूग्ण आहेत. मात्र मुंबईत मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण नोंदले असून एकूण २,९४३ एवढे रुग्ण आहेत.

ऑगस्ट महिन्यात ६१ डेंग्यूचे (Dengue) रुग्ण आढळले असून गेल्या आठ महिन्यांत १३८ रुग्ण आढळले. तर गॅस्ट्रोचे १,७३१ एवढे रुग्ण सापडले आहेत. तसेच स्वाईन फ्लूचे (Swine Flu) ८ रुग्णांची नोंद झाली असून एकूण रूग्ण ३६ झाले आहेत. तर काविळीचे २० रूग्ण झाले असून आतापर्यंत १५० रूग्ण झाले आहेत.

दरम्यान मुंबई महापालिकेकडून (BMC) घरोघरी जाऊन सर्वेक्षण, नागरिकांची विचारपूस, गोळ्यांचे वाटप, साचलेल्या पाण्यांची ठिकाणे आणि उंदराची बिळे नष्ट करण्यात आली. तसेच घराजवळचा परिसर स्वच्छ ठेवा. ताप, डोकेदुखी, डोळे लाल होणे अशी लक्षणे असतील तर उपचारांना उशीर करु नये, असे पालिका आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here