@maharashtracity

धुळे: रक्ताचा तुटवडा लक्षात घेवून रक्तदानाचे (blood donation) आवाहन शिवसेना (Shiv Sena) पक्षाच्यावतीने करण्यांत आले. यावेळी आयोजित रक्तदान शिबीरात ५२५ रक्तदात्यांनी रक्तदान करीत मोठे योगदान दिले.

रक्तदान सर्वश्रेष्ठ दान समजुन शिवसेना युवासेना आणि आईसाहेब सामाजिक संस्थेच्या विद्यमानाने रविवारी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त देवपुरात महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यांत आले. त्याच्या उदघाटन प्रसंगी पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार (Guardian Minister Abdul Sattar) बोलत होते.

ते पुढे म्हणाले की , सध्या रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाल्यांचे पाहून मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्याचे आवाहन केले. ललित माळी, हरिष माळी यांनी त्या आवाहनास प्रतिसाद देत रक्तदान शिबीर आज घेतले.

“या शिबीरात संकलित केलेल्या रक्ताचा उपयोग गोरगरीब आणि गरजु लोकांना होवू शकतो. रक्तदानाचे हे महान कार्य पाहून मनाला आंनद वाटला. शिवसेनेच्या माध्यमातून माळी परिवारातील तिसरी पिढी समाज कार्य करत आहे. त्यांच्या समाज कार्याची पावती जनता निश्चितच देईल,” असे ना अब्दुल सत्तार म्हणाले.

शिवसेनेचे धुळे – नंदूरबार (Dhule – Nandurbar) जिल्ह्यांचे संपर्क प्रमुख बबनरावजी थोरात यांनी देखील रक्तदान शिबीराचे आयोजनाबद्दल माळी बंधूंचे कौतुक केले.

दरवर्षी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आई सामाजिक संस्थेच्या माध्यमातून माळी बंधू धुळ्यात रक्तदान शिबीर घेत आहेत. यंदाचे हे ८ वे वर्ष होते. यावर्षी सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत चाललेल्या रक्तदान शिबीरात एकूण ५२५ रक्तदात्यांनी रक्तदान करून हे शिबीर यशस्वी केले. रक्तदात्यांना प्रमाणत्र आणि भेट वस्तुचेही वितरण यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाला शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे , जिल्हाप्रमुख हिलाल माळी, साक्रीच्या आमदार सौ मंजुळाताई गावीत, आविष्कार भुसे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, माजी विरोधी पक्षनेता तथा शिबीराचे मार्गदर्शक गंगाधर माळी , महानगरप्रमुख मनोज मोरे , प्रफुल्ल पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here