@maharashtracity

मुंबई: मुंबईत कोविड -१९ (covid-19) आणि नवीन विषाणू प्रकार असलेल्या ओमायक्रॉनचा (omicron) कहर वाढल्याने भीतीपोटी मुंबई महापालिका (BMC) प्रशासनाने मुंबईतील इयत्ता १ ली ते ९ वी आणि इयत्ता ११ वीच्या सर्व शाळा मंगळवारपासून ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (Mumbai school closed till January 31)

त्यामुळे आता कोविडचा संसर्ग आणखीन वाढत गेल्यास पुन्हा एकदा मुंबईची वाटचाल लॉकडाऊनच्या (lockdown) दिशेने सुरू होणार आहे. राज्य शासन व मुंबई महापालिकेने मुंबईत कोविड व ओमायक्रॉनला रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रकारच्या उपाययोजना युद्धपातळीवर सुरू केल्या आहेत.

राज्य शासन व मुंबई महापालिका यांनी मिळून शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने अवघ्या काही दिवसातच शालेय विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा प्रत्यक्ष शालेय शिक्षणाऐवजी ऑनलाइन शिक्षण (online education) घ्यावे लागणार आहे. मात्र इयत्ता १० आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा मात्र सुरू ठेवण्यात येणार आहेत.

सद्यस्थितीत जगातील काही देशांमध्ये व मुंबई महापालिका क्षेत्रात ओमायक्रोन या कोविडच्या नव्या प्रजातीचा प्रभाव वाढत आहे. मुंबईतील कोविड – १९ चा प्रादुर्भाव वाढत असल्याचे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबईतील इयत्ता १० वी व १२ वी चे वर्ग वगळता इयत्ता १ ली ते इयत्ता ९ वी आणि इयत्ता ११ वी चे सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळा पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या आदेशाने येत्या ४ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२२ पर्यंत प्रत्यक्ष बंद ठेवण्यात येणार आहेत.

मात्र इयत्ता १ ली ते इयत्ता ९ वी व इयत्ता ११ वी या वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष शाळेत उपस्थित न राहता यापूर्वी दिलेल्या निर्देशाप्रमाणे ऑनलाईन पध्दतीने अध्ययन अध्यापनाचे कार्य सुरु राहणार आहे.

विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू राहणार!

महापालिका क्षेत्रातील शाळेतील १५ ते १८ वर्ष वयोगट असलेल्या विद्यार्थ्याचे नियोजनानुसार लसीकरण केंद्रावर उपस्थित राहून लसीकरण (vaccination) सुरु राहणार आहे. याकरीता महापालिका शाळांसह अन्य खाजगी शाळांमधील लसीकरणास पात्र असणाऱ्या १५ ते १८ वर्ष या वयोगटातील विद्यार्थ्याचे लसीकरण करुन घेण्यासाठी शाळेत बोलवता येणार आहे.

पालिकेच्या शाळा या प्रत्यक्ष बंद ठेवण्यात आल्या असल्या तरी ऑनलाइन पद्धतीने शाळा सुरु राहणार आहेत. पालिका क्षेत्रातील १५ ते १८ वर्ष वयोगटातील विदयार्थ्यांचे नियोजनानुसार लसीकरण होणार असून यासाठी महापालिका शाळासह अन्य खाजगी शाळांमधील लसीकरणास पात्र असलेल्या विदयार्थ्यांना शाळेत बोलवता येईल, असे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी सांगितले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here