@maharashtracity

मुंबई हवामान विभागाच्या अंदाजानंतर तासाभरात मुंबईत पाऊस दाखल

मुंबई: मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने आगामी तीन तासांत मुंबईसह उर्वरित कोकण आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेत पाऊस पडेल, असा अंदाज गुरुवारी दुपारी तीनच्या दरम्यान व्यक्त केला आणि सायंकाळी चारच्या दरम्यान मुंबईत पावसाला सुरुवात झाली.

पश्चिम आणि पूर्व उपनगरात सुरुवात होऊन शहरातही पावसाच्या सरींनी हजेरी लावली. दुपारनंतर मुंबईवर ढगाळ वातावरण पसरले होते. हे ढगाळ वातावरण शुक्रवारपर्यंत कायम राहिल असा अंदाज करण्यात येत आहे.

दरम्यान, मुंबईसह उपनगरात घाटकोपर, भांडूप, गोरेगाव, पवई, जागेश्वरी अशा भागात पाण्याचे लोट गेले एवढ्या प्रमाणात पाऊस पडला. तर रस्त्यावर पाणी साचल्याचे दिसून येत होते. तसेच शहरातील दादार, भायखळा, चिंचपोकळी भागात पावसाने हजेरी लावली. पावसासासोबत वाऱ्याचा वेगही जास्त असल्याने वातावरण पाऊसमय झाले होते.

पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा तर बीड, परभणीतही पाऊस हजेरी देण्याची शक्यता असल्याचे गुरुवारी दुपारी वर्तविल्यानंतर पावसाला सुरुवात झाली. तर बुधवारी मुंबईत (Mumbai) सायंकाळी आणि रात्री पाऊस झाला. त्यामुळे सकाळी ऊन, सायंकाळी पाऊस आणि रात्री पावसाच्या प्रभावामुळे थंड वातावरण असा अनुभव मुंबईकरांना येत होता.

Also Read: पंधरा दिवसात हात प्रत्यारोपणाच्या दोन शस्त्रक्रिया

पावसाचा प्रभाव कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही दिसून येतोय. मात्र गुरुवारी जाहीर केलेल्या अंदाजानुसार वाऱ्याचा वेग ३० ते ४० किलोमीटर प्रती वेगाने या सर्व भागांतून वाहेल, त्यामुळे आवश्यक ती काळजी घ्या, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

कोकण (Konkan) आणि मध्य महाराष्ट्रात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह २१ नोव्हेंबरपर्यंत तर विदर्भात (Vidarbha) दिनांक १९ नोव्हेंबरपासून पावसाला सुरुवात होईल. विदर्भात पावसाचा प्रभाव १२ नोव्हेंबरपर्यंत जाणवेल, असा अंदाज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here