@maharashtracity

मुंबई: मुंबईत सध्या अग्निसत्र सुरू आहे. जोगेश्वरी (Jogeshwari) येथे एका सात मजली इमारतीमध्ये सहाव्या मजल्यावर आग लागण्याची घटना घडली. सुदैवाने या आगीवर अग्निशमन दलाने वेळीच नियंत्रण मिळवले व आग विझविल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.

प्राप्त माहितीनुसार, जोगेश्वरी (पश्चिम), हिल टॉप रोड, अगरवाल इंडस्ट्रियल इस्टेट येथील तळमजला अधिक सात मजली ऐबनी सोसायटीमध्ये गुरुवारी दुपारी २.१५ वाजेच्या सुमारास सहाव्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे इमारतीमध्ये व परिसरात खळबळ उडाली.

या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने (Fire brigade) तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन फायर इंजिन, वॉटर टँकर यांच्या साहाय्याने मदतकार्य युद्धपातळीवर सुरू केले.

आगीमुळे भयभीत झालेल्या रहिवाशांनी सुरक्षिततेसाठी तात्काळ इमारतीबाहेर धाव घेतली. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही प्रमाणात वित्तीय हानी झाली.
अग्निशमन दलाच्या जवानांनी अवघ्या अर्ध्या तासातच या आगीवर नियंत्रण मिळवले व आग विझविली. त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही.

मात्र ही आग का व कशी काय लागली , याबाबत स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाचे अधिकारी चौकशी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here