@maharashtracity

मंगळवारपासून फक्त निदर्शने करणार

मुंबई: नीट (NEET) तसेच पीजी २०२१, एमडी-एमएस (MD – MS) अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलल्यामुळे सोमवारपासून राज्यभरातील १४ शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टर (resident doctors) तसेच मुंबई शहरातील केईएम (KEM hospital) व सायन रुग्णालयातील (Sion Hospital) डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केले. त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला.

दरम्यान, सोमवारी रात्री उशीरा मार्ड (MARD) संघटनेचे प्रतिनिधी व वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत डॉक्टरांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा झाली असल्याचे, परंतु, अंतिम निर्णय झाला नसल्याचे संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले. त्यामुळे मंगळवारी काम बंद आंदोलन न करता केवळ निदर्शने केली जाणार असल्याचे मार्ड संघटनेकडून सांगण्यात आले.

दरम्यान, एमडीसाठी आवश्यक नीट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची भरतीप्रक्रीयेपूर्वी काऊन्सिलिंग करण्यात येते. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यावर या डॉक्टरांना निवासी डॉक्टर म्हणून काम करता येते.

यासाठी सेंट्रल मार्ड संघटनेने केंद्र सरकार, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, तसेच राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेला लवकरात लवकर काऊन्सिलिंग आयोजित करण्याची विनंती केली.

तरीही भरती प्रक्रिया सातत्याने पुढे ढकलण्यात येत असल्याने निवासी डॉक्टरांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मागील वर्षातील निवासी डॉक्टरांची संख्या कमी झाल्याने सध्याच्या निवासी डॉक्टरांवरील कामाचा ताण वाढत आहे.

Also Read: कोरोना आरटीपीसीआर फक्त साडेतीनशे रुपयात

तसेच नीट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे भरतीप्रक्रीयेपूर्वी काऊन्सिलिंग न झाल्याने त्यांना निवासी डॉक्टर म्हणून काम करता येत नाही. त्यामुळे काउंसिलिंग आणि भरती प्रक्रिया लवकर झाल्यास निवासी डॉक्टरांची संख्या वाढून सध्याच्या निवासी डॉक्टरांवरील ताण कमी होईल.

दरम्यान ही बाब समजून न घेता सरकारने भरती प्रक्रिया ६ जानेवारी २०२२ पर्यत पुढे का ढकलल्याने मार्डचे डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here