@maharashtracity

मुंबई: ताडदेव, येथील ‘कमला’ या तळमजला अधिक २० मजली इमारतीमध्ये १९ व्या मजल्यावर २२ जानेवारी रोजी लागलेल्या भीषण आगीमुळे आणखीन एका गंभीर जखमी महिलेचा कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता ८ वर गेली आहे. (Kamala building fire incident)

या आगीत ६ जणांचा होरपळून व नाकातोंडात धूर गेल्याने मृत्यू झाला होता आणि २४ जण जखमी होते. मात्र त्यानंतर २४ जानेवारी रोजी नायर रुग्णालयात उपचार घेणारे गंभीर जखमी मनीष सिंह (३८) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर आता कस्तुरबा रूग्णालयात उपचार घेणाऱ्या माधुरी चोपडेकर यांचा आज दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेत मृत पावलेल्यांची संख्या ६ वरून ८ वर गेली आहे.

तसेच, भाटिया रुग्णालयात (Bhatia Hospital) ५ गंभीर व ५ प्रकृती स्थिर असलेले एकूण १० रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे, मसीना रुग्णालयातही एका गंभीर रुग्णावर उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here