Twitter : @Rav2Sachin

मुंबई :

कलाकारांचा डेटाबेस तयार करण्यासाठी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीने एक प्रणाली विकसित केली आहे. या अकादमीच्या www.pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळाला भेट दिल्यावर कलाकारांनी artist Repository (कलाकार भांडार) या टॅब वर क्लिक करून माहिती भरावी. हा डेटाबेस अकादमीकडे असेल. ज्यांना असा डेटाबेस हवा असेल त्यांनी अकादमीशी ईमेल द्वारे संपर्क साधावा, असे आवाहन अकादमीने केले आहे.

अनेक कलाकारांचा डेटाबेस नसल्याची खंत वरिष्ठ कलाकारांनी मांडली होती. कोव्हीडच्या काळामध्ये कलाकारांचा डेटाबेस नसल्याने अनेकांना गैरसोय झाली होती. तसेच अनेक वेळा कार्यक्रम घेण्यासाठी कलाकारांची नावेच नसतात. हे अकादमीच्या लक्षात आलेले आहे.

हे लक्षात घेऊन सांस्कृतिक कार्यमंत्री आणि प्रधान सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे यांनी कलाकारांचा डेटाबेस तयार करण्याचे पाऊल उचलले आहे.

अकादमीच्या पुढील कार्यक्रमात देखील या डेटाबेसमधूनच कलाकारांची निवड करण्याचा मनोदय असून तसेच झाल्यास पारदर्शकता अधिक होईल. सर्व कलाकारांनी ही या प्रणालीचा फायदा घ्यावा, असे आवाहन रोकडे यांनी केले आहे.

अशीच एक अभिनव प्रणाली प्रेक्षकांसाठी ही तयार करण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कलाकादमीने मागील दीड वर्षात ज्यांना कुठेही संधी मिळायला नव्हती अशाच कलाकारांना, संस्थांना संधी देऊन कार्यक्रम आयोजित केलेले आहे,असे अकादमीने स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here