@maharashtracity

मुंबईत ८५८ सरकारी दवाखान्यांची गरज

मुंबई फर्स्ट आणि प्रजा फाऊंडेशनचा संयुक्त आरोग्य जाहिरनामा

मुंबई: गेल्या २१ महिन्यापासून मुंबईचा कोविडशी लढा सुरु असताना ४५ टक्के वैद्यकीय कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती प्रजा फाऊंडेशनने अहवालातून समोर आणली आहे.

मुंबईच्या लोकसंख्येच्या तुलनेत १५०० लोकसंख्येमागे एक याप्रमाणे ८५८ सरकारी दवाखान्यांची गरज असताना सध्या निव्वळ १९९ दवाखानेच उपलब्ध आहेत. यातील १८७ दवाखान्यापैकी फक्त १५ दवाखानेच १४ तास सुरु असून उर्वरित ५ ते ८ तासच सुरु असल्याची बाब ही फाऊंडेशनकडून सांगण्यात आली.

मुंबई फर्स्ट (Mumbai First) आणि प्रजा फाऊंडेशन (Praja Foundation) यांनी संयुक्तपणे मुंबईतील आदर्श जाहिरनामा (Ideal Manifesto) बुधवारी जाहिर केला. यावेळी मुंबईतील आरोग्य यंत्रणेतील वस्तूस्थिती समोर आणली.

सुमारे दोन वर्षापासून मुंबई कोविडशी लढा (Fight against Covid) देत आहे. या महामारीला (Pandemic) सामोरे जाताना मुंबईत सरकारी दवाखान्यांची (Government hospitals) गरज असल्याचे प्रकर्षाने समोर आले. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात (BMC budget) आरोग्य विभागासाठी साडेचार हजार कोटी कोटी रुपयाची तरतूद केली जाते. मात्र अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत नाही.

Also Read: भेसळयुक्त खाद्यतेलाचा ४४२ लीटरचा साठा जप्त

दर १५ हजार लोकसंख्येमागे एक दवाखाना असावा असे प्रमाण सांगते. मात्र मुंबईत सध्या फक्त १९९ दवाखाने असून यातील १८७ दवाखान्यापैकी १५ दवाखानेच १४ तास सुरु आहेत. उर्वरित दवाखाने अत्यंत कमी वेळ चालत असल्याचे प्रजा फाऊंडेशनने या जाहिरनाम्यात म्हटले आहे.

तर २०२० पर्यंत वैद्यकीय आणि पॅरा वैद्यकीय कर्मचाऱ्यांची (medical and para medical staff) अनुक्रमे ४४ टक्के व ४५ टक्के पदे रिक्त असल्याचे जाहिरनाम्यात नमूद करण्यात आले आहे. आरोग्य आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाताना आरोग्य विभागातील रिक्त पदे त्वरीत भरली जावीत असे या जाहिरनाम्यातून सुचविण्यात आले आहे.

आरोग्य केंद्र (PHC) आणि आपत्कालीन सेवांच्या कामकाज प्रक्रियेचे त्रयस्थ पक्षाकडून ऑडिट (Third Party audit) करण्याची आणि सुधारणेच्या लक्ष्याधारित उपाययोजना राबवण्याची आवश्यता असल्याचे प्रजा फाऊंडेशनने म्हटले आहे.

मुंबई फर्स्ट आणि प्रजा फाऊंडेशन यांनी संयुक्तपणे केलेल्या अभ्यासात सद्यस्थितीत मुंबईत प्राथमिक आरोग्य सेवांच्या प्रत्यक्ष गरजा आणि त्रूटी यांचा आढावा घेतला आहे. यात त्यांनी तज्ज्ञांच्या सूचनांची नोंद केली आहे. सार्वजनिक आरोग्य सेवा (Public Health Services) सक्षम होण्यासाठी कोणती कृती योजना आखली पाहिजे हे आपल्या जाहिरनाम्यात मांडले आहे.

मुंबई महापालिकेची निवडणूक (BMC polls) जवळ आली आहे. मुंबईच्या विकासासाठी नवे लोकप्रतिनिधी निवडण्याची वेळ येऊन ठेपली आहे. कोविड काळात आरोग्य सेवेतील त्रूटी प्रशासनाच्या लक्षात आल्या असतील.

या त्रूटी समजून घेऊन यंत्रणेतील त्रूटी दूर करण्यासाठी व गुणवत्ता वाढवण्यासाठी ठोस योजना प्रजाने तयार केली आहे. यातील काही सूचनांचा जाहिरनाम्यामध्ये समावेश करावा, असे आवाहन मुंबई फर्स्टचे अध्यक्ष नरींदर नायर (Narindar Nair) यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here