Twitter : @maharashtracity

मुंबई
नागरिकांच्या समस्यांवर विविध सर्वेक्षणे करून त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान (contribution in education sector) तसेच ’जे आता सरकारी धोरणे म्हणून आत्मसात केले गेले आहेत’, त्यांच्या शिकवण्याच्या ’अपारंपरिक पद्धती’ आणि विद्यार्थ्यांना विविध सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेण्यास प्रोत्साहित करणे यातून अनेक तरुणांना प्रेरणा दिलेल्या मुंबईतील प्रा. अवकाश जाधव (Prof Avkash Jadhav) यांना नवी दिल्लीत प्रतिष्ठित रेक्स ग्लोबल फेलोशिपने (Rex Global Fellowship) सन्मानित करण्यात आले.

भारताच्या संविधान दिनी (Samvidhan Day) संयुक्त राष्ट्र (UNO) आणि आंतराष्ट्रीय एनजीओ संघटनांनी सुरु केलेल्या या प्रतिष्ठित फेलोशिपने गौरविण्यात आले. प्रा. अवकाश जाधव हे मुंबईतील असून सध्या ते सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई येथे इतिहास विभागाचे प्रमुख आहेत. जाधव यांचे मुंबई शहराच्या हेरिटेजमध्ये (Heritage of Mumbai) महत्वाचे योगदान आहे. विशेषतः ५३ भूमिगत पाण्याच्या टाक्या शोधणे, मरीन ड्राइव्हचा वारसा आणि सौंदर्यशास्त्र पुनर्संचयित करणे आणि मुंबई शहराच्या हेरिटेज जतनासाठी ५ कोटी रुपये वाटप करण्यासाठी मान्यता मिळवणे, हे उल्लेखनीय काम त्यांनी केले आहे.

पालघरच्या (Palghar) विक्रमगड येथील आदिवासी भागात ’काश फाऊंडेशन, मुंबई’ (Kaash Foundation, Mumbai) या स्वयंसेवी संस्थेमार्फत त्यांचा सुरू असलेला सामाजिक प्रकल्प तितकाच महत्त्वाचा आहे. या ठिकाणी १५० कुपोषित बालके दत्तक घेतली गेली आहेत. १७ सप्टेंबर २०२२ रोजी आंतरराष्ट्रीय ’कोस्टल क्लीन अप ड्राइव्हसाठी’ (Coastal clean up drive) भारतीय तटरक्षक दलाच्या सहकार्याने आणि क्लीन अप मोहिमेसाठी ’३५०० हून अधिक’ विद्यार्थ्यांना एकत्रित करण्यात त्यांची महत्त्वपूर्ण कामगिरी होती. जाधव यांना महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे कौतुक पत्र देखील मिळाले. अध्यापनातील त्यांची २८ यशस्वी वर्षे आणि त्यांची ’सामाजिक सक्रियता’ विविध आंतरराष्ट्रीय मंचांद्वारे ओळखली गेली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here