@maharashtracity

मुंबई: गोरेगाव – मुलुंड लिंक रोडच्या कामासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या कामासाठी ६६० कुटुंबे बाधित होणार असून ५१ गाळेधारक आहेत. १०० वंचित कुटुंबे आदींचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. या रस्त्यांचे ५०% काम पूर्ण झाले असून २०२२ पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार आहे.

कांजूरमार्ग येथील भूखंडावर तळमजला अधिक २३ मजले ७ इमारती बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे येथील प्रकल्प बाधितांचे नजीकच्या परिसरातच पुनर्वसन करण्यात येणार आहे.

विहार तलावातून वाहून जाणाऱ्या पाण्याचा वापर – १५ कोटींची तरतूद

दरवर्षी पावसाळ्यात विहार तलाव ओव्हरफ्लो झाल्यावर त्याचे पाणी वाया जाते. हे पाणी अडवून ते भांडुप संकुल येथील जल शुद्धीकरण केंद्रात वळवून त्याचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना या पाण्याचा चांगलाच उपयोग होणार आहे. मात्र या कामासाठी सल्लागाराकडून अभ्यास सुरू आहे. प्रत्यक्ष बांधकामासाठी लवकरच निविदा मागविण्यात येणार आहेत. याकरिता १५ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here