Twitter : @maharashtracity

मुंबई :

सध्या वातावरणात प्रचंड प्रदुषण (Air pollution in Mumbai) पसरले असून सर्वच माध्यमांनी त्याची दखल घेतली आहे. दरम्यान, यातील काही वृत्तांमध्ये ’नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क वापरण्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने आवाहन केले आहे,‘ असे वृत्त प्रसिद्ध केली. मात्र मास्क वापरण्याबाबतचे कोणतेही आवाहन आपण केले नसल्याचे स्पष्टीकरण गुरुवारी मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) देण्यात आले.

वातावरण बदलांमुळे मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर सध्या विपरित परिणाम आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क (use of mask) वापरण्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने आवाहन केले असल्याचे वृत्त काही समाजमाध्यमांवर करण्यात आले. याबाबत मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येते की, हवेची गुणवत्ता विपरित होत असल्याचे आढळल्यानंतर या अनुषंगाने शासनाच्या संबंधित विभागांशी समन्वय साधून उपाययोजनांविषयी कार्यवाही विचाराधीन आहे. त्यामुळे अद्यापपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने मास्क वापरण्यासंदर्भात नागरिकांना कोणतेही आवाहन करण्यात आलेले नाही किंवा मार्गदर्शक तत्वेही अद्याप जारी करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे, प्रसारमाध्यमे व समाज माध्यमांमधून बृहन्मुंबई महानगरपालिकेचा उल्लेख करुन प्रकाशित किंवा प्रसारित केलेले वृत्त निराधार व अयोग्य आहे, असे स्पष्ट करण्यात येत आहे.

त्याचवेळी हवामान आणि तत्संबंधीत सर्व यंत्रणांशी मुंबई महानगरपालिका समन्वय साधत असून त्यांच्याकडून प्राप्त निर्देशांनुसार यथोचित उपाययोजना, निर्णय आदींची माहिती नागरिकांपर्यंत वेळोवेळी पोहोचविण्यात येईल, असेही आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here