@maharashtracity

मुंबई: मुंबईत डेल्टा प्लसचा पहिला रूग्ण दगावला (First Delta plus patient died in Mumbai) असल्याचे आज पालिकेकडून सांगण्यात आले. मुंबईतील डेल्टा प्लसचा हा पहिला बळी आहे. दरम्यान मुंबईत ११ डेल्टा प्लसचे रूग्ण होते. त्यापैकी एकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने आता मुंबईत दहा डेल्टा प्लसचे रूग्ण असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान यावर बोलताना पालिका आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे म्हणाल्या किं ही ५५ वर्षीय महिला डेल्टा प्लस पॉझिटिव्ह रूग्ण होती. ती महिला फुफ्फुसाच्या गंभीर आजाराने ग्रस्त होती. तसेच त्या कित्येक दिवसापासून अंथरुणाला खिळलेल्या होत्या. शिवाय त्या घरीच ऑक्सिजनवर होत्या. कोविड पॉझिटिव्ह झाल्या नंतर त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉ. गोमारे म्हणाल्या.

दरम्यान, या महिलेची २१ जुलै रोजी टेस्टिंग करण्यात आली होती. २४ जुलै रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर २७ जुलै रोजी तिचा मृत्यू झाला. मात्र पालिकेकडे बुधवारी ११ ऑगस्ट रोजी ती महिला रूग्ण डेल्टा प्लस पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला.

तत्पूर्वी तिचा मृत्यू कोविड पॉझिटिव्ह (covid positive) असाच करण्यात आला. मात्र त्यानंतर त्यांचा कोविड अहवाल जीनोम सिक्वेसिंग साठी पाठविण्यात आला होता. जीनोम सिक्वेसिंग (Genome sequencing) अहवालातून त्या डेल्टा प्लस पॉझिटिव्ह असल्याचे निदान करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here