@maharashtracity

राज्यात ८८९ नवीन रुग्णांची नोंद

मुंबई: राज्यात ( State governmet ) ( MVA) आज ८८९ नवीन रुग्णांची नोंद झाली. ही नोंद पहिल्या लाटे नंतर सर्वात कमी रुग्ण असल्याचे सांगण्यात येत आहे. Registration of 889 new patients in the state

आता राज्यातील करोना बाधित ( corona active cases) रुग्णांची एकूण संख्या ६६,०३,८५० झाली आहे. दरम्यान रविवारच्या आरोग्य विभागाच्या ( health ministry) माहिती नुसार 14 जिल्ह्यामध्ये दैनंदिन रूग्णांची संख्या शून्य तर 12 जिल्ह्यांमध्ये दैनंदिन रुग्ण एक अंकी होती असल्याचे समोर येत आहे. तर राज्यात मुंबई (Mumbai) , ठाणे ( Thane) , पुणे (Pune) व रत्नागिरी ( Ratnagiri) वगळता एकाही जिल्ह्यात एकही मृत्यू (death case) नसल्याचे सांगण्यात आले.

दरम्यानच्या काळात सण उत्सवांचे ( festive season) दिवस सुरु असून शिवाय बऱ्यापैकी मुक्त संचार सुरु असून देखील आजची ही आकडेवारी राज्यातील कोरोना नियंत्रणात येत असल्याचे दाखवत आहे. मात्र लसीकरण (vaccination) आणि कोविड नियमांचे ( corona pandemic rules) पालन केल्यास शून्यावर येण्यास वेळ लागणार नाही, असे तज्ज्ञ सांगत आहेत. आज १,५८६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर राज्यात आजपर्यंत एकूण ६४,३७,०२५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४७% एवढे झाले आहे.

राज्यात आज रोजी एकूण २३,१८४ ॲक्टिव्ह रुग्ण (corona positive) आहेत. तसेच राज्यात आज १२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,१९,७८,१५५ प्रयोगशाळा (Laboratory) नमुन्यांपैकी ६६,०३,८५० (१०.६६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,८३,०९२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये ( home quarantine) आहेत तर ९५७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत दिवसभरात २६३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद (Corona patient record ) करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७५४७७० एवढी झाली आहे. तर ७ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १६२२० मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here