@maharashtracity

ट्रायलच्या वेगावर विपरित परिणाम

डॉक्टर मात्र सकारात्मक

मुंबई: मुलांसाठी कोरोना कोवोवॅक्स लसीच्या होणाऱ्या चाचणीसाठी (trail of covovax on children) गेल्या १० दिवसांत काही मुलांची नावे समोर आली असून आता मुलांची संख्या १७ झाली आहे. त्यामुळे डॉक्टर सकारात्मक असून हा प्रयोग यशस्वी होईल असे वाटत आहे.

दरम्यान, आवश्यक असणारी मुलांची संख्या होत नसल्याने लस ट्रायलच्या वेगावर परिणाम होईल की काय असे वाटत होते.

लसीच्या चाचणीसाठी ९२० मुलांची नायर रुग्णालयाला (Nair Hospital) आवश्यकता असून सध्या १७ मुले चाचणीसाठी योग्य असल्याचे आढळून आले आहे. चाचणीशी संबंधित माहितीसाठी पालकांकडून सुमारे ५०० कॉल आले आहेत. यामध्ये १७ मुले रुग्णालयात आली आणि त्यांनी चाचणीत लिहिलेल्या अटींची पूर्तता केली आहे. (17 children registered for trial vaccination of covovax jab)

मात्र सिरो सर्वेक्षणात ५० टक्के मुलांमध्ये कोविड विरूद्ध अँटीबॉडीज (antibodies) तयार झाली असल्याचे समोर येत आहे. तर बहुतांश मुले इतर आजाराने पिडीत असल्याचे आढळले. त्यामुळे चाचणी निकषानुसार त्या मुलांना सहभागी करुन घेता येत नाही.

मुंबईत शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरु झाल्याने मुलांच्या सुरक्षिततेची चिंता पालकांना आहे. मुलांचे हित लक्षात घेऊन पालक आता त्यांना चाचणीत सामील करुन घेत आहेत.

नायर रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, पालक त्यांच्या मुलांना चाचणीत सहभागी करत आहेत. २ ते १७ वर्षे वयोगटातील मुले या चाचणीत सहभागी होऊ शकतात. मुले सहभागी होत असली तरीही निकषांतील अधिकाधिक मुलांची गरज असल्याचे त्या डॉक्टरने सांगितले.

यावर बोलताना नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले की, मुलांनाही कोरोना विषाणूपासून संरक्षणाची गरज असल्याचे पालकांना आता वाटू लागले आहे. शाळा, महाविद्यालयेही सुरू झाली आहेत, अशा परिस्थितीत पालक आता चाचणीत सहभागी होताना दिसत आहेत. येत्या काही दिवसांत ही संख्या आणखी वाढण्याची आशा यावेळी व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, पालकांना प्रोत्साहित करुन मुलांना चाचणीत सहभागी करुन घेता येईल. अशा मुलांच्या निकालात काही अतिरिक्त गुण दिल्यास पालक प्रेरित होण्याची शक्यता ही काही तज्ज्ञांनी यावेळी सुचवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here