@maharashtracity

ध्वनी प्रदूषण टाळण्याचे सलग दुसरे वर्ष

मुंबई: कोरोना वर्तणुकीचे निर्बंध यंदाही सुरु असल्याने गणपती विसर्जनासाठी ढोल, डिजे, किंवा लाऊडस्पीकर वाजविण्यात आले नाहीत. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीतील ध्वनी प्रदूषण (Noise pollution during Ganesh Visarjan) खालावली असल्याचे आवाज फाउंडेशन (Awaaz Foundation) या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक आणि संयोजक सुमेरा अब्दुलाली (Sumaira Abdulali) यांनी सांगितले. गेल्या वर्षी प्रमाणे विसर्जन मिरवणुकीत (Ganesh Visarjan) आवाज कमी नोंदविण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे.

दरम्यान, आवाज फाउंडेशनच्या मते मुंबईकरांना आता फक्त कोरोनाचेच नाहीतर आरोग्याचेही महत्त्व पटले असून त्यांनी स्वत: हून आवाज करणे टाळत असल्याचे निदर्शनात आले. ध्वनी प्रदूषणाचा परिणाम फक्त कानांवर होत नाही तर आरोग्यावरही मोठ्या प्रमाणात होतो.

अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि सरकारने घातलेल्या नियमांचे पालन करतच यंदा अनंत चतुर्थीच्या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.

गणेशोत्सव ही अगदी साध्या आणि नियमांचे पालन करुन साजरा करावा, असे आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात आले होते. या सर्व नियमांचे पालन करत यावर्षी गणेशोत्सव साजरा केला गेला.

आवाज फाउंडेशनने नोंदवलेल्या अहवालानुसार, दुसऱ्यांदा एवढ्या कमी आवाजात विसर्जन पार पडले आहे. नागरिकांना आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबद्दल जागृती झाली आहे. त्यामुळे मोठ-मोठ्या चौपाट्यांवरही लोकांनी गर्दी टाळली. सोबतच आवाज करणाऱ्या गोष्टीही दूर ठेवल्या.

यापुढच्या गणेशोत्सवाच्या कालावधीतही गणपती मंडळांकडून असेच सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आवाज फाउंडेशनच्या सुमेरा अब्दुलाली यांनी व्यक्त केली आहे.

यंदा आवाज फाउंडेशनने मुंबईतल्या अनेक गणेशमूर्ती विसर्जन स्थळांच्या ठिकाणी ध्वनी प्रदुषणाची नोंदणी केली आहे. मात्र, यंदा गणपती विसर्जन शांततेत पार पडले असल्याचा अहवाल आवाज फाउंडेशनने जाहीर केला आहे. अनेक गणेशमूर्ती विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी नव्हती.

दरम्यान, सर्वाधिक आवाजाची नोंद ही गिरगाव चौपाटीवर केली गेली. मात्र, ती ही आवाजाची पातळी १०० डेसिबलच्या खाली होती.
आवाजाची नोंद :

ठिकाण डेसिबलमध्ये

राम मंदिर लेन ७७
वरळी ऑट्रिया मॉल ७६
हाजिअली ८८
गिरगाव चौपाटी ९३.१
गिरगाव विसर्जन ठिकाण ८६.९
हाजिअली ८५
शिवाजी पार्क ८०

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here