@maharashtracity

वाढत्या सक्रिय रुग्णांमुळे चिंता वाढली

मुंबई: गावाहून परतीचा प्रवास करून येणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे आवाहन राज्य टास्क फोर्सच्या (Task Force members worried about returning Mumbaikars) सदस्यांनी केले आहे.

गणपती विसर्जनानंतर (Ganesh Visarjan) आगामी दोन आठवडे महत्त्वाचे असून रुग्णांचा प्रवास इतिहास अभ्यासावा लागणार असल्याचे तज्ज्ञ सुचवीत आहेत.

यावर बोलताना अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांनी सांगितले की, दिनांक ५ ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी महत्त्वपूर्ण असून गणेशोत्सव करून परतणाऱ्या प्रवाशांवर पालिकेचे लक्ष राहणार आहे. त्यामुळे, चाचण्या वाढवण्यावर (Increase in testing) भर दिला गेला असल्याचे काकाणी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, गेल्या चाळीस दिवसात सक्रिय रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. चाचण्या, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि उपचार या त्रीसूत्रीचा अवलंब केला पाहिजे. या काळात सौम्य लक्षण दिसून येत असल्याने आयसोलेशन करण्याकडे कल वाढविण्याची सूचना कृती दलाकडून करण्यात येत आहे.

गेल्या सव्वा महिन्यापासून मुंबईत ४५० ते ५०० रूग्ण आढळून येत आहेत. आकडेवारीनुसार, १ ते १७ सप्टेंबर दरम्यान, मुंबईत सुमारे ७,४०७ कोविड -19 रुग्णसंख्या नोंदली गेली.

ऑगस्टमध्ये याच कालावधीत 4,943 रुग्ण नोंद झाले होते. तर, 10 ते 19 सप्टेंबर या कालावधीत 4,173 नोंद झाले आहेत. सक्रिय रुग्णांच्या संख्या दुप्पट झाल्याने आरोग्य विभाग अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे.

गेल्या दहा दिवसांत सक्रिय रुग्णांची संख्या 3 हजारांवरुन साडे चार हजारांच्या पुढे गेली आहे. सध्या 4,629 एवढे सक्रिय रुग्ण आहेत.
तर राज्य कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुप पंडीत यांच्या मते आगामी दोन आठवडे प्रत्येकाला काळजी घेणे गरजेचे आहे.

सध्या मृत्यू कमी आहेत. पण, रुग्णसंख्या आणि सक्रिय रुग्ण वाढले असून कोविड वर्तणूक आता आणखी कठोर पद्धतीने पाळली पाहिजे.

10 ते 19 सप्टेंबरमधील आकडेवारी

रुग्ण मृत्यू सक्रिय रुग्ण

441 5 4,537
365 4 4,666
354 7 4,823
347 6 4,744
367 5 4,696
514 4 4,602
446 2 4,654
434 3 4,658
485 6 4,739
420 5 4,629

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here