@maharashtracity

मुंबई : सध्या कोरोनाचा प्रादूर्भाव नियंत्रणात आलेला आहे. त्यामुळेच राज्य सरकारने ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र केईएम मेडिकल कॉलेजमधील एमबीबीएसचे शिक्षण घेणारे काही विद्यार्थी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पालकांनी संमती दिली तरच पालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना घेतलं जाईल, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. (students will allow to school only after consent of parents)

राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे, ४ ऑक्टोबरपासून मुंबईसह राज्यात इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा, कॉलेज सुरू करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने परिपत्रक काढून तशी मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध केली आहेत. मात्र पालिकेच्या केईएम मेडिकल कॉलेजमधील एमबीबीएसचे शिक्षण घेणारे काही विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह (MBBS students tested corona positive in KEM) आल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती देताना महापौरांनी, जर पालकांनी लेखी संमती दिली तरच पालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना घेतलं जाईल त्यासाठी पालकांनी शाळा समितीकडे संपर्क करावा,

एका बेंचवर एक विद्यार्थी असेल. या विद्यार्थ्यांना तोंडाला लावायचे मास्क पालिकेकडून देण्यात येणार आहेत. मात्र कोरोना नियमांचे पालन करूनच शाळा, कॉलेज सुरू करण्यात येतील, असे महापौर म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here