@maharashtracity

धुळे: शिरपुर तालुक्यात पुन्हा एकदा गांजा शेतीचे प्रकार उघड होत आहेत. शिरपुर शहर पोलिसांनी नवापाडा (मुखेड) शिवारात एका शेतावर छापा टाकून २ लाख १७ हजाराचे गांजाची लागवड केलेली रोपे हस्तगत केली.

याप्रकरणी पो ना पंकज पाटील यांनी शिरपुर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नवापाडा शिवारात आलसिंग रुमालसिंग पावरा याच्या शेतात बेकायदेशीरपणे गांजा पिकवला जात असल्याची खबर मिळाल्याने दि. २९ रोजी ३ वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला.

पोलिस उप निरीक्षक संदीप मुरकुटे यांच्यासह पथकाने शेतात पाहणी केली तेव्हा वन जमिनीवरील शेतातील पिकांमध्ये प्रतिबंधीत असलेला मानवी मेंदुवर विपरीत परिणाम करणारा गांजा सदृश्य अंमली पदार्थाचे रोपे लावलेली आढळली.

एकुण २१७ किलो ६५५ ग्रॅम वजनाची हिरवी, ताजे झाडे फांदया, मुळासकट उपटून जप्त करण्यात आली. याची किंमत एकुण २ लाख १७ हजार ६५५ रुपये इतकी आहे. याप्रकरणी पोलिसांनी आलसिंग रुमालसिंग पावरा (वय ४२) रा.नवापाडा ता.शिरपुर याच्यावर गुन्हा दाखल करीत ताब्यात घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here