यवतमाळ
संशयावरुवन चार जणांची हत्या केल्याने यवतमाळमध्ये खळबळ उडाली आहे. ही घटना कळंब तालुक्यातील तिरझडा येथील पारधी बेड्यावर मंगळवारी रात्री उशिरा घडली. या घटनेत रेखा गोविंद पवार, पंडित घोसले, ज्ञानेश्वर घोसले, सुनील घोसले यांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन दारूड्या पती गोविंद वीरचंद्र पवार याने आपली पत्नी रेखा गोविंद पवार हिची हत्या केली. यापूर्वी रात्री ११ वाजता त्यांच्यामध्ये वाद झाला. तेव्हा संतापलेल्या जावयाने सबलीच्या साहाय्याने पत्नी रेखा, सासरा पंडित, सासू रखमा, मेव्हणा ज्ञानेश्वर आणि सुनील यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.
हा हल्ला इतका भीषण होता की, यात पंडित घोसले, ज्ञानेश्वर घोसले, सुनील घोसले यांचा जागीच मृत्यू झाला. सासू रखमा घोसले या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपी गोविंद वीरचंद्र पवार याला ताब्यात घेतलं.