विश्वाच्या इतिहासात प्रथमच एक अद्भुत अकल्पनीय अशी घटना ह्या गीता जयंतीला होणार आहे, जेव्हा गीता परिवाराच्या तत्त्वाधानमध्ये विश्वातील 180 देशांतून एक लाख गीताप्रेमींद्वारे अविरत 42 तास ऑनलाईन अखंड अष्टादश गीता पारायण ज्यात संपूर्ण श्रीमद्भगवद्गीतेच्या 18 अध्यायांचे 18 वेळा शुद्ध संस्कृत पारायण केले जाईल.

श्रीमद्भगवद्गीतेचे प्राकट्य मोक्षदा एकादशीच्या दिवाशी सुमारे 5160 वर्षांपूर्वी झाले होते. ह्या वर्षी मोक्षदा एकादशी 22-23 डिसेंबरला आहे. ह्या उत्तम प्रसंगी गीता परिवाराद्वारे शनिवार, 23 डिसेंबर सकाळी 6 वाजल्यापासून ते रविवार, 24 डिसेंबर रात्री 12 वाजेपर्यंत गीतेच्या संपूर्ण 18 अध्यायांचे 18 वेळा अखंड पारायण ऑनलाईन झूम ॲपवर 180 देशांतील हिंदी, इंग्रजी, मराठी, गुजराती, बंगाली, कन्नड, तमिळ, तेलुगु, ओडिआ, नेपाळी, आसामी, मल्याळम, सिंधी भाषांमध्ये 1 लाखांहून अधिक गीताप्रेमींद्वारे करण्यात येईल.

कोणीही भक्त आपल्या स्थानी स्वतःच्या सोयीनुसार ह्या पारायणात Learngeeta.com आणि गीता परिवाराचे यूट्यूब चॅनल Geeta Pariwar च्या माध्यमाने लाईव्ह सामील होऊ शकतील. श्रीराममंदिर जन्मभूमीचे कोषाध्यक्ष व गीता परिवाराचे संस्थापक प.पू. स्वामी श्रीगोविन्ददेव गिरिजी महाराजांद्वारे ह्या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. 1986 मध्ये संस्थापित गीता परिवाराच्या लर्नगीता उपक्रमांतर्गत सद्य काळात विश्वातील सर्वात मोठा गीता वर्ग पूर्णतः निःशुल्क असा चालवला जातो. ज्यात रोज झूम ऑनलाईन माध्यमाद्वारे 8 लाखांहून अधिक लोक हिंदी, इंग्रजी, मराठी, गुजराती, बंगाली, कन्नड, तमिळ, तेलुगु, ओडिआ, नेपाळी, आसामी, मल्याळम, सिंधी अशा 13 भाषांमधून सकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 2 वाजेपर्यंत 19 निरनिराळ्या वेळांच्या सत्रांतून 8000 निष्काम गीतासेवींद्वारे नित्य 2000 हून अधिक झूम वर्गांत निःशुल्क गीता शिकत आहेत.

2020 मध्ये सुरु झालेल्या लर्नगीता उपक्रमात तीन वर्षात 3 वर्ष ते 93 वर्ष वयोगटातील हजारो लोकांनी संपूर्ण गीता कंठस्थ केली आहे. Learngeeta ॲपवर कोणीही इच्छुक नोंदणी करुन आपली गीता यात्रा सुरु करु शकतात. ह्या उपक्रमाचे वैशिष्ट्य हे आहे की ऑनलाईन घरबसल्या नि:शुल्क अत्यंत सरळरित्या वैदिक पद्धतीने गीतेचे शुद्ध संस्कृत उच्चार प्रशिक्षित प्रशिक्षांद्वारे शिकवण्यात येतात. श्रीभगवंताने स्वतः गीतेतील 18व्या अध्यायात 68व्या व 69व्या श्लोकांत सांगितले आहे की गीता शिकणारे आणि शिकवणारे सर्वच मला अत्यंत प्रिय होतात.

गीता जयंतीच्या उत्तम प्रसंगी ऑनलाईन Learngeeta.com वर घरबसल्या सामील होऊन ह्या महायज्ञामध्ये गीता अध्यायांचे पठण करुन अलौकिक आनंदाचा अनुभव घेऊ शकता. स्क्रीनवर श्लोक दिसतील. ऑनलाईन व्यतिरिक्त देशात व परदेशात 1000 हून अधिक स्थानी भक्तगण एकत्र येऊन ऑफलाईनही गीता पारायण करणार आहेत. आपल्या जवळच्या स्थळावर गीता पठणात सामील होणे शक्य आहे. Learngeeta.com/geetajayanti वर जाऊन किंवा 1800 203 6500 टोलफ्री नंबरवर कॉल करुन गीता जयंती कार्यक्रमासंबंधी अधिक माहिती मिळवू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here