मुंबई

हिवाळ्यात दही खायं योग्य की अयोग्य? या विषयावरुन अनेकदा चर्चा केली जाते. हिवाळ्यात दररोजच्या आहारात दहीचं (Eat Curd In Winter) सेवन केल्याने शरीरावर वाईट परिणाम होत असल्याचा सल्ला तुम्हाला अनेकांनी दिला असेल.

जाणून घेऊया तज्ज्ञांचा सल्ला…

  • – दही पचनाला चालना देते आणि चयापचय वाढवण्यास मदत करते ज्यामुळे शरीराला आंतरिक उष्णता निर्माण होण्यास मदत होते.
  • तज्ज्ञांनुसार, दही प्रोबायोटिक्स पचनास मदत करतं. आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
  • – मात्र, सर्दी झाल्यावर फ्रिजमधलं दही थेट बाहेर काढून खाल्ल्यास त्याच्या तापमानामुळे काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
  • – दह्यात चांगले बॅक्टेरिया, विटॅमिन, प्रोटीन, मॅग्नेशियम, कॅल्शिअम आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळतं. यामुळे दही प्रत्येक मोसमास आरोग्य वाढवणारं असतं.
  • – दह्यामुळे आतड्यांना चांगलं बॅक्टेरिया मिळतं. दही कॅल्शिअम, विटॅमिन बी१२ आणि फॉस्फरसने समृद्ध आहे.
  • – श्वसनासंबंधी आजार असणाऱ्यांनी सायंकाळी ५ नंतर दही खाणं टाळावं. यामुळे कफ वाढू शकतो.
  • – फ्रीजमधलं दही थेट ताटात घेऊ नये. दही आधीच फ्रीजमधून बाहेर काढावं आणि खोलीच्या तापमानात आल्यानंतर त्याचं सेलन करावं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here