मुंबई
पोस्टपेड बिल भरण्यास उशीर झाल्यास तुरुंगाची हवा खावी लागू शकते. हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे.
आता पोस्टपेडचे बिल भरण्यास उशीर केल्यास तुम्हाला कोर्टात जावे लागू शकते. तसेच न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्यास तुरुंगवासही होऊ शकतो. त्यामुळे सावध व्हा आणि पोस्टपेड बिलाच्या नवीन नियमांबद्दल देखील जाणून घ्या.
पोस्टपेड बिल न भरल्यास टेलिकॉम कंपन्यांना गुन्हा दाखल करण्याची परवानगी मिळाली आहे. यापूर्वी त्यांना असं करण्याची परवानगी नव्हती. यापूर्वीपर्यंत तुमचं कनेक्शन बंद केलं जात होतं. सोबतच वारंवार बिल भरण्याचा इशारा दिला जात होता. त्याचे एजेंट तुम्हाला वारंवार कॉल करीत होते. जर तुम्ही या बाबींकडे दुर्लक्ष केलं तर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल केला जातो.
यानंतर तुमची केस कर्ज कलेक्टरकडे पाठवली जाते. ते तुम्हाला बिल भरण्याची विनंती करतात. जर तुम्ही यावर पावलं उचलली नाहीत तर ते तुम्हाला कायदेशीर नोटीस पाठवू शकतात. जर वारंवार तुम्ही असं करीत असाल तर तुमच्याविरोधात कायदेशीर नोटीस पाठवली जाते. दिलेल्या तारखेला कोर्टात हजर न झाल्यास तुम्हाला डिफॉल्टर घोषित केलं जाऊ शकतं.