मुंबई

कोरोना विषाणूच्या साथीचा उद्रेक अद्याप पूर्णपणे संपलेला नाही. कोरोनाचे नवीन प्रकार सापडल्याने पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा नवा व्हेरियंट धोकादायक असल्याचं सांगितलं जात आहे. काय आहेत त्याची लक्षणे (Covid-19 variant JN.1 Symptoms) आणि जाणून घेऊया तुम्ही स्वतःचं संरक्षण कसं कराल…

  • – नाताळ आणि नव्या वर्षा पूर्वीच कोरोना व्हायरसने आपला धोकादायक JN.1 व्हेरियंट भारतात पाठवला आहे. लोकांमध्ये हा व्हेरियंट जलद गतीने पसरत आहे. गोवा, केरळ आणि महाराष्ट्रात याच्या केसेस वाढत आहेत. आतापर्यंत चार जणांचा या व्हेरियंटमुळे मृत्यू झाला आहे.
  • – हा Omicron BA.2.86 चा एक प्रकार आहे आणि जागतिक आरोग्य संघटनेने याला धोक्याची घंटा म्हणून संबोधले आहे आणि ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ या श्रेणीमध्ये ठेवले आहे. याचा अर्थ हा व्हेरियंट घातक आहे.
  • – कोविड-19 चा हा नवा व्हेरियंट गेल्या व्हेरियंटच्या तुलनेत अधिक संक्रमित होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
  • – JN.1 स्ट्रेनची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत, त्यामुळे या नवीन प्रकाराची चिन्हे आणि लक्षणे समजून घेणे महत्त्वाचे आहे. ताप, नाक वाहणे, घसा खवखवणे, डोकेदुखी, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या, अत्यंत थकवा, स्नायू कमकुवत होणे या लक्षणांचा समावेश होतो.
  • – अशी मान्यता आहे की, कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झालेल्या अधिकांश रोग्यांना वरचेवर श्वसन संस्थेसंदर्भातील लक्षणं दिसू शकतात.
  • – असे मानले जाते की काही प्रकरणांमध्ये, पीडितांना भूक न लागणे आणि सतत मळमळ यासारखी लक्षणे देखील जाणवत आहेत. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here