मुंबई

इतर चॉकलेट्सच्या तुलनेत डार्क चॉकलेटमध्ये कोकोचं प्रमाण अधिक आणि साखर कमी असते. हे चॉकलेट इतर दुधाच्या चॉकलेटपेक्षा अधिक फायदेशीर आणि कमी गोड असतं. डार्क चॉकलेट खाण्याचे अनेक फायदे सांगितले जातात. मात्र मर्यादित प्रमाणातच खायला हवं. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्युट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, चॉकलेटमधील (Dark chocolate benefits) घटकांमुळे मेंदूची कार्यप्रणाली सुधारते आणि मानसिक स्वास्थ चांगलं राहण्यास मदत होते.

संशोधनानुसार कोणते मुद्दे आले समोर

  • – अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, चॉकलेटमध्ये कोको फ्लेवेनॉल्स असतं, ज्यामुळे मेंदूचं आरोग्य चांगल ठेवण्याची क्षमता असते.
  • – फ्लेवनॉल्स एक अँन्टीऑक्सिडंट आहे जे शरीरातील ऑक्सिडेटिव तणाव आणि सूज कमी करतं. ७० टक्के किंवा त्याहून अधिक कोको असणारे चॉकलेट खाल्ल्याचे काय असतात फायदे, जाणून घेऊया
    – रक्तदाब कमी करणे, एलडीएल कॉलेस्ट्रॉलचा स्तर कमी करणे, एचडीएल कॉलेस्टेरॉलचा स्तर वाढवणे आणि रक्त प्रवाहात सुधारणा करण्यासाठी ओळखली जाते.
  • – डार्क चॉकलेटमध्ये कॅलरीज अधिक असल्या तरी यात फायबरचं प्रमाण मुबलक असतं. डार्क चॉकलेट खाणाऱ्यांना यात फायबर असल्याने भूक कमी लागते.
  • – डार्क चॉकलेटच्या सेवनामुळे शरीरात कोर्टिसोल सारखे तणाव हार्मोन्स कमी होतात, यामुळे तणाव कमी होण्याबरोबरच व्यक्तीला शांत आणि रिलॅक्स वाटतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here