मुंबई
नव्या वर्षाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अशावेळी लोक आपले मित्र, नातेवाईकांना भेटवस्तू देऊन नववर्षाच्या शुभेच्छा देतात. मात्र भेटवस्तू देताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा यामुळे नुकसान होऊ शकतं. ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीला भेटवस्तू देताना या वस्तू चुकूनही नका देऊ. अन्यथा तत्सम व्यक्तीला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
ज्योतिषशास्त्रानुसाक, कोणालाही काळ्या रंगाची वस्तू देऊ नये. काळ्या रंगाची भेटवस्तू नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं. आणखी काही वस्तू आहेत, ज्या देताना लक्ष ठेवायला हवं.
या वस्तू चुकूनही देऊ नका…
ज्योतिषशास्त्रानुसार, नव्या वर्षानिमित्ताने कोणाला भेटवस्तू देण्याचा विचार करीत असाल तर कोणतीही टोकदार वस्तू देऊ नये. कात्री, सुई वा अशी कोणतीही वस्तू जी टोकदार असेल अशा वस्तू देऊ नये. याशिवाय कोणाला देवी-देवतांची मूर्ती भेटवस्तूत देऊ नये. रूमालही देऊ नये. असं केल्यास मनात निराशा उत्पन्न होते. आणि नात्यात दुरावा येतो. आणि एक गोष्ट म्हणजे कर्ज घेऊन कोणालाही भेटवस्तू (दागिने) देऊ नये. याचा अर्थ तुम्ही सर्व सकारात्मक ऊर्जा भेटवस्तूत देत आहात.
भेटवस्तू म्हणून द्या या वस्तू…
कोणालाही भेटवस्तूच्या रुपात पुस्तक देणं शुभ मानलं जातं. यासोबत वही वा पेन दिलं तर चांगले परिणाम होतात. याशिवाय कपडे किंवा आपल्या हाताने तयार केलेली वस्तू देऊ शकता. सोनं-चांदी देणंही शुभं मानलं जातं. भेटवस्तू देताना मोकळ्या आणि प्रेमाने द्यावी चिडचिड केल्याने वस्तूसोबत नकारात्मकत ऊर्जाही जाते.