मुंबई

अभिनेता शाहरूख खान याची पत्नी गौरी खान कायदेशीर प्रक्रियेत अडकत असल्याचं दिसून येत आहे. तिला अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने नोटीस पाठवली आहे. गौरी खान रिअल इस्टेट कंपनी तुलसियानी ग्रुपची ब्रँड अॅम्बॅसेडर आहे. तिला 2015 मध्ये लखनऊच्या या रियल इस्टेट कंपनीचं ब्रँड एम्बॅसेडर बनवण्यात आलं होतं. या कंपनीवर बँक आणि गुंतवणूकदारांची सुमारे 30 कोटींची फसवणूक केल्याचा आरोव आहे. यामुळे गौरी खान चौकशीसाठी ईडीच्या रडारवर आली आहे.

तुलसियानी ग्रुपवर दाखल केलेल्या फसवणुकीच्या प्रकरणात गौरी खानलाही आरोपी करण्यात आलं आहे. लवकरच या प्रकरणात गौरी खानची चौकशी केली जाऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, गौरी खानला अनेक प्रश्न विचारली जाऊ शकतात. गौरी खानचं कंपनीसोबत काय करार होता, यातून तिला किती पैसे दिले जात होते, आदी प्रश्न विचारले जाऊ शकतात.

काय आहे संपूर्ण प्रकरण
हे प्रकरण सर्वात आधी मार्च 2023 मध्ये समोर आलं होतं. हे प्रकरण लखनऊस्थित सुशांत गोल्फ सिटीच्या तुलसियानी ग्रुपच्या एका प्रकल्पाशी संबंधित आहे. या प्रकल्पांतर्गत मुंबईत राहणाऱ्या एका व्यक्तीने 2015 मध्ये 85 लाखांचा एक फ्लॅट खरेदी केला होता. मात्र सर्व रक्कम भरल्यानंतरही त्याला हा फ्लॅट मिळाला नव्हता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here