मुंबईत नाकावाटे लसीकरणाला सुरुवात

Twitter: @maharashtracity

मुंबई: ६० वर्षे वयावरील पात्र नागरिकांना कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिनची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिन्यांनी नाकावाटे इन्कोव्हॅक लसीची (iNCOVACC vaccine) प्रतिबंधात्मक मात्रा शुक्रवारपासून देण्यास सुरुवात केली. यात मुंबईत ३६ जणांनी ही लस घेतली असल्याचे पालिकेच्या आकडेवारीवरुन समोर येत आहे.

दरम्यान, शुक्रवारी एकूण ३६ लाभार्थ्यांचे लसीकरण झाले असून त्यापैकी महानगरपालिका लसीकरण केंद्रावर (vaccination centre) २३ लाभार्थ्यांचे इन्कोव्हॅक व खाजगी लसीकरण केंद्रावर १३ लाभार्थ्यांचे लसीकरण झाले असल्याचे सांगण्यात आले. मुंबई महानगरपालिकेतर्फे (BMC) मुंबई महानगरातील प्रत्येक विभागात एक लसीकरण केंद्र असे २४ लसीकरण केंद्रांवरए नाकावाटे घ्यावयाच्या इन्कोव्हॅक लसीद्वारे कोविड.१९ प्रतिबंधक लसीकरण शुक्रवारपासून ६० वर्षे वयावरील पात्र नागरिकांना कोविशिल्ड (Covishield) अथवा कोवॅक्सिनची (Covaxin) दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिन्यांनी इन्कोव्हॅक लसीची प्रतिबंधात्मक मात्रा घेता येणार असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले. 

आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पश्चिम उपनगरे डॉ. संजीव कुमार, उपायुक्त सार्वजनिक आरोग्य संजय कुऱ्हाडे यांच्या निर्देशानुसार कोविड संसर्ग प्रतिबंधक उपाययोजनांबाबत महानगरपालिका आरोग्य विभाग लसीकरणाचे काम करत आहे.

मुंबईत १६ जानेवारी २०२१ पासून कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीमेला सुरुवात झाली असून सुरुवातील प्राधान्य गटांचे व त्यानंतर दिनांक १ मे २०२१ पासून १८ वर्ष वयावरील सर्व नागरिकांचे कोविड लसीकरण करण्यात आले आहे. तर बूस्टर डोस १० जानेवारी २०२२ पासून देण्यास सुरुवात झाली. २६ एप्रिल २०२३ पर्यंत कोविड प्रतिबंधक लसीची पहिली दुसरी आणि प्रतिबंधात्मक मात्रा घेतलेल्या लाभार्थ्यांची एकूण संख्या २ कोटी २१ लाख ९६ हजार ९९५ इतकी आहे. तर फक्त पहिली मात्रा घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या १ कोटी ८ लाख ९३ हजार ६७९ आहे. तसेच दुसरी मात्रा घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या ९८ लाख १५ हजार ०२० इतकी आहे. प्रतिबंधात्मक डोस घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या १४ लाख ८८ हजार २९६ इतकी असल्याचे सांगण्यात आले.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here