@maharashtracity

मुंबई: बेस्ट उपक्रमाने गणेशोत्सवाच्या निमित्ताने ३१ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत प्रवाशांसाठी ७९९ रुपयांचा सुपर सेवन प्लॅन १९९ रुपयांत उपलब्ध केला आहे. या योजनेअंतर्गत प्रवाशांना ७५ टक्के सवलत मिळणार आहे. या योजनेचा लाभ “बेस्ट चलो ॲप ” वापरणारे विद्यमान प्रवासी तसेच नवीन प्रवासी यांना मिळणार आहे.

बेस्टची ही योजना म्हणजे प्रवाशांसाठी एक पर्वणीच असणार आहे. या योजनेत सहभागी झालेल्या प्रवाशांना ५० फेऱ्यांचा लाभ मिळणार आहे. वातानुकूलित तसेन विना वातानुकूलित बसगाड्यांमध्ये २० रुपयांपर्यंतच्या सर्व तिकीटावर प्रवासाची सुविधा उपलब्ध आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी, गुगल प्ले स्टोअरमधून चलो अँप (Chalo App) डाऊनलोड केल्यानंतर बसपास सेक्शनमध्ये जाऊन ही योजना शोधावी. गणेशोत्सव (Ganeshotsav) योजना निवडून प्रवाशांनी त्यांचा तपशील भरुन त्यांचा फोटो अपलोड करावा. डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे तसेच नेट बँकिग किंवा युपिआयद्वारे १९९ रुपयाचे ऑनलाईन प्रदान करुन प्लान खरेदी करावा लागणार आहे.

तसेच, ही योजना कार्यान्वित करण्यासाठी Use Now यावर क्लिक करावे. बसमध्ये चढल्यावर ‘Start a ‘Trip’ वर क्लिक करुन तुमचा मोबाईल फोन बसवाहकाच्या तिकीट यंत्राजवळ वैधतेसाठी धरावा. वैधता पूर्ण झाल्यावर प्रवासाकरिता डिजिटल पावती उपलब्ध होईल. ही संपूर्ण प्रक्रिया कॅशलेस आणि पेपरलेस असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here