२५ लाखाची दंड वसुली

@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिकेने प्रतिबंधित प्लास्टिक विक्री विरोधात जुलैपासून धडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या साडेतीन महिन्यात पालिकेच्या धडक कारवाई पथकाने विविध ठिकाणी धाडी टाकून ४९४ प्रकरणात २,५५१ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केले आहे.

तसेच, प्रतिबंधित प्लस्टिक (banned plastic) विक्रेत्याकडून तब्बल २४ लाख ७० हजार रुपये दंड वसूल केला आहे. पुढील काही दिवसांत आणखीन जोरदारपणे कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती उपायुक्त संजोग कबरे यांनी दिली.

मुंबई महापालिकेने (BMC) पर्यावरणाला हानिकारक प्लास्टिकवर बंदी घातली आहे. मात्र, तरीही अनेक ठिकाणी या प्रतिबंधित प्लॅस्टिकची विक्री केली जात आहे. विशेषतः मॉल, मार्केट, दुकाने, फेरीवाले अशा ठिकाणी या प्रतिबंधित प्लस्टिकची विक्री होत असल्याने पालिकेने या ठिकाणी अचानकपणे धाडी टाकून कारवाईला सुरुवात केली आहे. १ जुलैपासून आतापर्यंत २,५५१ किलो प्रतिबंधित प्लॅास्टिक जप्त केले करून २४ लाख ७० हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here