@maharashtracity

मुंबई: मुंबईत मंगळवारी दुपारी दोन वाजेपर्यंत शहरात ४४.२० मिमी, पूर्व उपनगरे ३६.५५ तर पश्चिम उपनगरात ४९.१२ मिमी एवढ्या पावसाची नोंद करण्यात आली. मंगळवारच्या पाऊस नोंदीत पश्चिम उपनगरातील काही ठिकाणे आघाडीवर असल्याचे दिसून आले. दरम्यान, सकाळपासून मुंबईत पावसाची संततधार सुरु असल्याचेही दिसून आले.

मंगळवार उजाडला तोच मुळात मुंबईकरांना पाऊस घेऊनच. दोन दिवस असून नसून पडणाऱ्या पावसाने सकाळपासून रिपरिप सुरु केली होती. दुपारी दोन वाजेपर्यंत मुंबईतील विविध ठिकाणच्या स्वयंचलित पाऊस नोंदींच्या केंद्रांवरील नोंदीप्रमाणे पश्चिम उपनगरातील नोंदी सर्वाधिक होत्या. यात कांदिवली फायर स्टेशन ८३ मिमी, दहिसर फायरस्टेशन ७६ मिमी, आर सी वॉर्ड ७५ मिमी आणि कांदिवली वर्कशॉप ७४ मिमी अशी पावसाची नोंद करण्यात आली.

शहरातील हाजी अली पंपींग स्टेशन येथे ६१ मिमी, दादर वर्कशॉप येथे ५९, भायखळा ५६, डी वॉर्ड ५५ मिमी, मलबार हिल ५३ मिमी, वडाळा फायर स्टेशन ४८ मिमी अशी नोंद करण्यात आली. तसेच पूर्व उपनगरातील भांडूप कॉम्प्लेक्स ४६ मिमी, विक्रोळी फायर स्टेशन ३९ मिमी, एम पश्चिम वॉर्ड ३५ मिमी नोंद झाल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, मंगळवारच्या पावसाने शहरात तसेच उपनगरात पाऊस संबंधित तक्रारी करण्यात आल्या. यात शहरातील सक्कर पंचायत, एसआयईएस कॉलेज वडाळा तसेच अंधेरी सबवे येथे पाण्याचा निचरा धीम्या गतीने सुरु होता. तर पश्चिम उपनगरात एका ठिकाणी घराच्या भिंतीचा काही भाग पडल्याची तक्रार पालिकेकडे करण्यात आली. शहरात ३, पूर्व उपनगरात ३ तर पश्चिम उपनगरात ४ अशा एकूण १४ ठिकाणी झाडे तसेच फांद्या पडण्याच्या तक्रारी मिळाल्या. पश्चिम उपनगरात चार ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या तक्रारी करण्यात आल्या. तर शहरात २ ठिकाणी दरडीचा काही भाग पडल्याच्या तक्रारी करण्यात आल्या.

बुधवारचा पाऊस अंदाज

कुलाबा वेधशाळेने आगामी २४ तासात मुंबई शहर व उपनगरात आकाश साधारण ढगाळलेले राहून मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. तर काही भागात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here