माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांची माहिती

Twitter – @maharashtracity

मुंबई: मुंबई महानगरपालिकेतील शाळा अंतर्गत शिपाई, हमाल आणि माळी व वॉचमन अशी मिळून हजारो पदे रिक्त असल्याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी उघड केली. माहितीनुसार पालिका शाळेत शिपाईची एकूण १७९७ पदे रिक्त असून यात ३९१ हमाल आणि १२२ माळी व रखवलदारांची अशी पदे रिक्त आहेत.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे मुंबई महानगरपालिकेतील शाळा अंतर्गत रिक्त पदांची माहिती मागितली होती. यात शिपाईची एकूण मंजूर पदे २,६३५ असून रिक्त पदांची संख्या १७९७ आहे. हमाल ही पदे ६०२ असून सध्या ३९१ पदे रिक्त आहेत तर माळी तसेच रखवलदारांची १२२ पदे रिक्त असून मंजूर पदांची संख्या २३१ असल्याचे सांगण्यात आले.

प्रत्येक शाळेत शिपाई ही पदे महत्त्वाची असून सद्यस्थितीला मोठ्या प्रमाणावर ही पदे भरली गेली नाही. यामुळे शाळा स्तरावर दैनंदिन कामकाज करण्यासाठी अडचणी येतात. यावर्षी शिक्षण विभागाने निधी वाढवला असून रिक्त पदे तत्काळ भरणे आवश्यक आहे. महत्वाची रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी, अशी मागणी अनिल गलगली यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here