यकृत प्रत्यारोपणासाठी खासगी रुग्णालयांमध्ये सुमारे ५० ते ६० लाख इतका खर्च येत असल्याने सर्वसामान्य रुग्णांना तो आवाक्याच्या बाहेर असतो. विशेषतः यकृत प्रत्यारोपणाचा प्रकल्प सेंट जॉर्जेस रुग्णालयात राबविण्यात येणार असल्याचे संकेत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून मिळाले आहेत. तशा सुचना मुश्रीफ यांनी विभागाला दिल्या. सोमवारी सकाळी मुश्रीफ जे जे रुग्णालय समुह भेटीवर गेले होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

यावर केंद्र सरकारला पत्रव्यवहार केला असल्याचे आयुक्त यांनी सांगितले. तर पत्रव्यवहाराचा पाठपुरावा करून कंपनीच्या जागेसाठी बैठक आयोजित करावी, असे मुश्रीफ यांनी आयुक्तांना सुचित केले आहे. याचवेळी मुश्रीफ यांनी निर्माण होत असलेल्या सुपर स्पेशालिटी इमारतीची पाहणी केली. त्यात त्यांनी ए, बी, सी व डी या विंगच्या बांधकामाची पाहणी केली. हे बांधकाम विनाविलंब लवकर पूर्ण करावे, यासाठी मुश्रीफ यांनी सुचना दिल्या.

ग्रेट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जेजे समुह रुग्णालय याची स्थापना १८४५ साली झाली असून हे भारताततील सर्वात जुन्या वैद्यकीय महाविद्यालयापैकी एक आहे. या रुग्णालयांतर्गत सेंट जॉर्जेस, कामा हॉस्पिटल, गोकुळदास रुग्णालय, अर्बन हेल्थ सेंटर तसेच रुरल हेल्थ सेंटर पालघर हे येत असल्याचे सांगितले. तसेच भारतातील पहिली लॅप्रोस्कॉपी शस्त्रक्रिया जे जे रुग्णालयात झाली असून देशातील पहिले एआरटी सेंटर हे जे जे रुग्णालयात सुरु झाले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here