प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग मुंबई केंद्र प्रमुख सुनिल कांबळे यांची माहिती

यंदा मुंबईसह राज्यात १०६ टक्के पाऊस होणार असून मुंबईत सरासरी पेक्षा पाऊस (average rainfall in Mumbai) असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामानशास्त्र विभाग )Meteorology department) मुंबई केंद्र प्रमुख सुनिल कांबळे यांनी व्यक्त केला. तसेच यंदाचा पाऊस सतावणारा राहणार आहे. कधी कमी वेळेत अधिक पाऊस तर कधी मध्येच खंड पडणार. तसेच कधी संततधार राहणार असून कधी कोसळधारेने सतावणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

दरम्यान गेल्या वर्षी पाऊस नॉर्मल होता. मात्र यंदा मुंबईत सरासरी पेक्षा अधिक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला. सरासरी २३०० मिमि पेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. सध्या मान्सुनची प्रगती व्यवस्थित सुरू असून  १०६ टक्के पाऊसाचा अंदाज आहे. तसेच २ ते ३ टक्के अधिक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. तर जून पेक्षा जुलै मध्ये मोठ्या पावसाची अधिक शक्यता अहे. जून मध्ये ५०० मिमी, जुलै मध्ये ९००  मिमी तर ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये ९०० मिमी पाऊस साधारणता होत असताना यंदाची सरासरी वाढण्याची शक्यता आहे. यंदा अधिक पाऊस होणार आहे. संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर वातावरणीय शंकू स्थिती निर्माण होत असल्याने पावसाला वेग मिळणार आहे. तसेच पूर्व पश्चिम किनारपट्टीवर शिअर झोन निर्माण होणार आहे. तसेच अनेक वेळा वादळी स्थिती निर्माण होणार असल्याने यंदा पाऊस अधिक आहे. तसेच मुंबईसह यंदा राज्यात चांगला पाऊस अपेक्षित असला तरी तो एकाच वेळी पडण्याची शक्यता नसल्याचे कांबळे म्हणाले. हा पाऊस पडताना कधी त्यात  खंड पडू शकतो. तर कधी कमी वेळात अधिक पाऊस होणार आहे. हा वातावरणीय बदलामुळे परिणाम साधल्याचे सांगण्यात आले.

राज्यात ५ ते ६ नवे रडार बसवणार :
देशभरात ४० रडार असून रडारची (Radar) संख्या ६५ वर नेण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. पावसाचा अंदाज करण्यास रडार उपयोगी असून त्यातून तंतोतंता वाढते. यातील महाराष्ट्रात आणखी ५ ते ६ नविन रडार बसवणार असून आगामी दोन वर्षात सोलापूर, औरंगाबाद, नागपूरमध्ये प्रत्येकी १ रडार बसवण्याचे नियोजित आहे. तर मुंबईसाठी विलेपार्ले, वसई, कल्याण आणि पनवेल या ठिकाणी रडार बसवणार असल्याचे प्रादेशिक हवामानशास्त्र विभाग मुंबई केंद्र प्रमुख सुनिल कांबळे म्हणाले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here