By Anant Nalawade

Twitter: @nalavadeanant

मुंबई: महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त आज मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात राज्याचे महिला व बालविकास मंत्री व पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते सोमवारी ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी लोढा म्हणाले की, सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी सोडविण्यासाठी आता जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत रोज लोक दरबार भरविला जाईल. यात आता अन्य विभागाच्या तक्रारीही स्वीकारल्या जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here