@maharashtracity
मुंबई: अंधेरी (पूर्व) मरोळ नाका येथे सोमवारी संध्याकाळी आग लागली. सुदैवाने या आगीवर काही अवधीतच अग्निशमन दलाने नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती व त्यात कदाचित मोठी वित्तीय व जीवित हानी झाली असती.
प्राप्त माहितीनुसार, अंधेरी (पूर्व), मरोळ नाका, मेट्रो रेल्वे स्टेशन समोरील बजरंग पेट्रोल पंप येथे सोमवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास आग लागली. सुदैवाने या आगीवर तात्काळ नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, ही आग का कशी काय लागली, याचे कारण समजू शकलेले नाही. अग्निशमन दल व स्थानिक पोलीस या आगीचे कारण शोधत आहेत.