@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिकेतर्फे एफ/दक्षिण विभागात जलवाहिनी स्थलांतर व झडपा बसविण्याचे काम हाती घेतल्याने मंगळवारी काळाचौकी, शिवडी परिसरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. मात्र, आता या जलवाहिन्यांचे काम पार पडल्यानंतर शिवडी, काळाचौकी, कॉटन ग्रीन आदी परिसरातील पाणी पुरवठा जास्त दाबाने होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यासंदर्भातील माहिती शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी दिली. काळाचौकी, शिवडी व कॉटन ग्रीन आदी परिसरात पाणीपुरवठा सुस्थितीत करण्यासाठी गोलंदजी हिल जलाशयाला पाणी पुरवठा करणारी ७५० मी. मी.व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर ४५० मी.मी. (शिवडी पश्चिम) व ६०० मी. मी. ( शिवडी पश्चिम/ शिवडी पूर्व ) व्यासाच्या जलवाहिन्या जकेरिया बंदर येथील नवीन १५०० मी. मी.व्यासाच्या जलवाहिनीवर स्थलांतरित करण्याचं काम चालू करण्यात आले आहे.

तसेच, ७५० मी.मी. व्यासाच्या जलवाहिनीवर नवीन झडपा बसविण्याचे कामही चालू करण्यात आले आहे. त्यामुळेच या कामाची पाहाणी करण्यात आली. या कामामुळे मंगळवारी शिवडी येथील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. मात्र, संध्याकाळपर्यंत काम पूर्ण झाल्यानंतर गोलंदजी जलाशयामधील पाणीपुरवठयात काहीशी वाढ होणार आहे. त्यामुळे शिवडी पूर्व व पश्चिम, कॉटन ग्रीन, काळाचौकी परिसरातील पाणीपुरवठा जास्त दाबाने होणार आहे, अशी माहिती पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याने दिली.

या जलवाहिनीचे काम जल अभियंता संजय आर्ते, कार्यकारी अभियंता राजेंद्र नार्वेकर, सहाय्यक अभियंता जलकामे परीक्षण शहर – १ चे अधिकारी सोनटक्के, दुय्यम अभियंता जलकामे परीक्षण शहर १ श्री. देसाई

सहाय्यक अभियंता जलकामे हे दक्षिण संदीप संगपाल, दुय्यम अभियंता जलकामे दक्षिण श्रीमती दर्शना पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले, अशी माहिती माजी नगरसेवक सचिन देवदास पडवळ यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here